परंडा(प्रतिनिधी) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्लोबलच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव शिवमती आशाताई मोरजकर उपस्थित होत्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी, पोवाडे, कवी लेखन, कविता संग्रह ,लघु कथा, पटनाट्य आदी साहित्य हे समाजाच्या उद्धारासाठी प्रसिद्ध केले. त्याचबरोबर त्यांनी दलित आणि वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला. कार्यक्रमावेळी शिवानी जगताप, कल्याणी क्षिरसागर, सानिका नाईकनवरे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर ग्लोबलच्या सचिव आशाताई मोरजकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन त्यांच्या विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्थक तौर तर आभार प्रदर्शन साहिल साळुंके या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.