परंडा येथे डी बी ए समूहच्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

परंडा दि.०२(प्रतिनिधी) येथील विश्रामगृह परंडा येथे डी बी ए समूहच्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी डीबीए समूह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे ,ॲड. दयानंद धेंडे, बौद्धचार्य महावीर बनसोडे, युवा नेते भारत धेंडे , मंजुषा सुरवसे राजनंदिनी धेंडे, आरती बनसोडे,शोभा बनसोडे , यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले विचार धम्म प्रवर्तन दिनानिमित्त मांडले. उपस्थित सिद्धार्थ बनसोडे, बालाजी बनसोडे, हरिभाऊ गोडगे, संतराम पाटील, विश्वजीत बनसोडे, सोमा चौतमाल, मनीषा कांबळे ,नीता बाळू इत्यादी बहुसंख्येने नागरिक, महिला वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!