परंडा (माझं गांव माझं शहर ) येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने ६२५ वी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी मा. डी.बी.ए समूह संस्थापक /अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे, नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष कालिदास काशीद, कीर्तनकार बालाजी महाराज, महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे,माजी पंचायत समिती सदस्य दीपक गायकवाड, एडवोकेट दयानंद धेंडे ,यांनी सामुदायिक संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली यावेळी पांडुरंग माढेकर साहेब,बालाजी महाराज, यांनी विचार मांडले यावेळी जय हनुमान ट्रेलर अंकुश जमदाडे, धर्मराज नरोटे, प्रीतम ओव्हाळ, हरिभाऊ गोडगे, छगन चौधरी, रवींद्र शिंदे,नागराज आहिरे ,दत्तात्रय आहिरे ,श्रीकांत वाघमोडे, सचिन भालेकर, संतोष डाके, रामचंद्र काशीद,सुरज काळे, बाबा दनाने ,गणेश जमदाडे, इत्यादी नागरिक व नाभिक समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले.