बार्शी(माझं गांव माझं शहर) बार्शीतील तरुण पत्रकार आणि हुरहुन्नरी कलाकार, व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांचे दि.२८ रोजी पहाटे निधन झाले. वयाच्या केवळ ३५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून ते मेंदूच्या आजाराशी झुंज देत होते. मात्र उपचार सुरू असतानाही आज पहाटे साडेपाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
पत्रकारितेसोबतच कला क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनामुळे पत्रकार आणि कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. हर्षद यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मित्रपरिवार, नातेवाईक आणि ओळखीच्या वर्तुळात शोककळा पसरली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!