माता रमाई जयंती निमित्त “आशाताई मोरजकर” यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान .

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा येथील जिजाऊ ब्रिगेडच्या मराठवाडा उपाध्यक्ष शिक्षण संस्थेच्या सचिव आशाताई गोरख मोरजकर यांनी मोठमोठ्या आजारांना झगडत महिला जागृती , छत्रपती शिवराय , छ . राजश्री शाहु महाराज ,महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले , फातीमा शेख , अहिल्यादेवी होळकर , त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे विचार…

अधिक बातमी वाचा...

परंडा जिल्हा धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही-तहसीलदार काकडे

धाराशिव(माझं गांव माझं शहर) दि.10.02.2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास परंडा, जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपासारखा धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीनुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात…

अधिक बातमी वाचा...

आला रे आला गुराखी आला ; घोषणा देत धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष  केला .

परंडा दि ९ : – परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल जाहिर होताच . भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जवळा (नि) गटातून १९२१ मताची लिड घेऊन विजयी घोषित झाल्या बरोबर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला . जल्लोष मिरवणूकीत , आला रे आला गुराखी आला असा शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यांना टोमणा मारणाऱ्या घोषणा देण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा.

परंडा, (प्रतिनिधी ) संतकृपा ही जीवनातील सर्वात मोठी कृपा असते.थोर संत हे कल्पतरुप्रमाणे असतात.मनुष्य जीवनाला योग्य दिशा देऊन त्याला उत्तम दशेला प्राप्त करुन देण्यासाठी संतानी महान कार्य केले आहे.प्रगटदिन सोहळा साजरा करुन संतानी दिलेली शिकवण सर्वानी आपल्या आचरणात आणावी असे मत हभप धर्मराज दादा महाराज सामनगांवकर यांनी व्यक्त केले. शहरात विविध ठिकाणी श्रीसंत गजानन महाराज…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न-दिव्यांग उद्योग समुह

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची सोय व्हावी. दिव्यांग व्यक्तींना जाण्यासाठी त्रास होऊ नये व धाराशिव येथे हेलपाटा होऊ नये याकरिता दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून परंडा येथे दिव्यांग तपासणी कॅम्प महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होतात. त्यानिमित्त दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरामध्ये…

अधिक बातमी वाचा...

संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) परंडा येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी दि.४ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.   यानंतर सराफा असोसिएशन यांची बैठक होऊन कार्यकारणी तयार करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमतते विनोद शेठ चिंतामणी अनाळकर तर उपाध्यक्ष शिवप्रसाद बागडे तर सचिव म्हणून शिवाजी पंडित यांची निवड करण्यात आली यामध्ये संघटनेचे…

अधिक बातमी वाचा...

कपिलापुरीतील महिलांशी शैला वेताळ यांनी साधला संवाद.

परंडा (प्रतिनिधी) कपिलापुरी, कारंजा, आवार पिंपरी, सिंचन क्षेत्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरलोणी गटातील वडनेर गणातून मैदानात उतरलेल्या शैला वेताळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा पुरस्कृत उमेदवार शैला वेताळ यांनी विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आधारित प्रचाराला गती दिली आहे. रविवारी त्यांनी कपिलापुरीच्या पंचक्रोशीत थेट महिलांच्या भेटीगाठी घेऊन व संवाद साधून आपलं…

अधिक बातमी वाचा...

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी व राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची जाहीर सभा संपन्न

भूम (प्रतिनिधी)तालुक्यातील ईट (जिल्हा धाराशिव) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी व राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मा. मोदीजींच्या आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजींच्या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी आणि आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी व…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न

परंडा(प्रतिनिधी)जिल्हा परिषद व पंचायत समिती परंडा सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न झाला. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यातून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात परंडा पंचायत समिती गणातून श्री. वशिष माणिक जंतकर, जिल्हा परिषद गणातून सौ. किसकिंदा बाबासाहेब देशमुख, तसेच खासापुरी पंचायत…

अधिक बातमी वाचा...

जवळा गटात वैशालीताई राहुल मोटे यांची पदयात्रा-राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पवार यांना विजयी करा.

    परंडा(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद गट जवळा (नि) येथे स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब भगवान पवार, पंचायत समिती गणाचे हनुमंत रामदेव कातुरे, सौ. प्रतिक्षाताई मुके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी च्या नेत्या वैशालीताई मोटे यांनी पदयात्रा व प्रचाराचा शुभारंभ जवळा गावचा दर्गा हजरत निजामुद्दीन या…

अधिक बातमी वाचा...

संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये माझा भगवा फडकू दे आमदार तानाजी सावंत यांचे भैरवनाथाकडे साकडे.

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा भूम वाशी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दि ३१ जानेवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने डोंजा जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नारळ फोडून भैरवनाथाकडे साकडे घालत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शिवसेना पक्षाचे डोंजा गटाचे उमेदवार अविदाबाई जगताप…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना (उबाठा ) गटात भूकंप ; तालूकाध्यक्ष मेघराज पाटील शिवसेना(शिंदे) गटात.

परंडा दि ३१ : – शिवसेना ( उबाठा ) गटात भूकंप . अचानकपणे तालूका प्रमुख मेघराज पाटील यांनी मला तुमच्याशी हितकुज करायचे आहे या टॅगलाईन खाली दि ३१ रोजी शहरातील प्रितम मंगल कार्यालयात बैठक घेतली असता शिवसेना उबाठा पक्षाचे पद आणि सदस्याचा राजीनामा देऊन शेकडो कार्यकत्यासह शिवसेना शिंदे गटात आमदार प्रा डॉ तानजीराव सावंत यांच्या…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!