तुळजापुरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह; देवीच्या नित्योपचार पूजेला भाविकांची गर्दी

तुळजापूर, २५ (माझं गांव माझं शहर ) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला तुळजापुरात मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला, म्हणजेच आज गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी, देवीची नित्योपचार पूजा मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने संपन्न झाली. या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. पहाटे ६ ते सकाळी…

अधिक बातमी वाचा...

परंडा- रा.गे. शिंदे महाविद्यालयाचा पूरग्रस्त गावाला मदतीचा हात.

परंडा दि.२५ (प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परांडा या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त गाव वाघेगव्हाण या गावास भेट देऊन ज्या लोकांचे मुसळधार पावसाच्या पाण्याने नुकसान झालेले आहे संसार उघड्यावर पडले आहेत अशा लोकांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूचे किट…

अधिक बातमी वाचा...

पूरग्रस्त देवगाव (खु.) येथे आरोग्य पथकातर्फे ग्रामस्थांची तपासणी व औषधोपचार

परंडा (माझं गांव माझं शहर) देवगाव (खु.) येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आसू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नळगाव उपकेंद्राच्या आरोग्य पथकाने गावात वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिरामध्ये गावातील पूरग्रस्त आणि गरजू व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना जागेवरच आवश्यक औषधोपचार देण्यात आले. गावात पुराचे पाणी शिरल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही…

अधिक बातमी वाचा...

परंडा-कारंजा येथील पूरपरिस्थितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी; बोटीतून केला पाहणी दौरा.

परंडा(तानाजी घोडके ) परंडा तालुक्यातील कारंजा आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीची पाहणी आज दि.२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) बोटीमधून प्रवास करत त्यांनी पूरग्रस्त भागाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण…

अधिक बातमी वाचा...

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने १५० पूरग्रस्तांची सुखरूप सुटका

परंडा(तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण परिसरात आज आलेल्या भीषण पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल १५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. जीव धोक्यात घालून करण्यात आलेल्या या यशस्वी बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. खासदार निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वाघेगव्हाण परिसरात पुरामुळे…

अधिक बातमी वाचा...

महापुराच्या पाण्यात अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य गेले वाहून मदतीची गरज !

परंडा(तानाजी घोडके ) परंडा शहरासह तालुक्याला परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सीना नदी, चांदणी, उल्फा, उल्का, दुधना नद्यांना महापूर आल्याने परंड्याहून बार्शी, भूम, कुर्डुवाडी, करमाळा जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर ग्रामीण भागातील अनेक गावात नद्यांचे पाणी घुसल्याने ग्रामीण भागाचा देखील तालुक्याशी संपर्क तुटला आहे. महापुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या घरातील अन्नधान्य…

अधिक बातमी वाचा...

भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मा.ना. मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती..

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे तर जिल्ह्यातील बऱ्याच मंडळात दोन तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे. सततचा पडत असलेला मुसळधार पाऊस पाहता धाराशिव जिल्ह्यात विशेषत: परंडा, भूम व वाशी तालुक्यात प्रथमच असा इतक्या मोठ्या प्रमाणात विक्रमी पाऊस पडला आहे. यामुळे. या तीन…

अधिक बातमी वाचा...

डॉ. अभिराज सूर्यवंशी यांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

परंडा(माझं गांव माझं शहर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील (गट अ वर्ग १ ) परीक्षेतून डॉ. अभिराज सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांच्या नावाची शिफारस शासनाकडे करण्यात आलेली आहे. डॉ. सूर्यवंशी हे मुळचे परंडा तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी आहेत. डॉ. अभिराज सूर्यवंशी यांचे एमबीबीएस एमडी शिक्षण आहे….

अधिक बातमी वाचा...

परंडा आगारात नवीन बस दाखल -जेष्ठ प्रवाशी महिलांच्या हस्ते पुजन.

परंडा ,ता.२० (प्रतिनिधी )परंडा बसआगारात दोन दिवसापुर्वी नवीन पाच बसेस दाखल झाल्या आहेत. परंडा-पुणे वल्लभनगर मार्गावर शुक्रवार ता.१९ रोजी येथील बसस्थानक फलाटावरुन नवीन बसचा शुभारंभ जेष्ठ प्रवाशी,महिलांच्या हस्ते पुजन करुन सोडण्यात आली.नवीन बसेस दाखल होत असल्याने प्रवाशातुन समाधान व्यक्त होत आहे.येथील बस आगारातुन तालुका परीसरात व लांब पल्ल्यासाठी खिळखिळ्या बसेस धावत आहेत.परंडा आगाराचे उत्पन्न चांगले…

अधिक बातमी वाचा...

‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी’ कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा पनवेलमध्ये भव्य सोहळा.

नवी मुंबई (प्रतिनिधी) सामान्यतेच्या चाकोरी मोडून अपार जिद्दीने स्वतःचा प्रवास घडवणाऱ्या महिलांचा गौरव करणे हे केवळ स्त्रीशक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘मनमुक्त फाऊंडेशन’ तर्फे येत्या शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता सुरुची हॉल, पनवेल येथे ‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी, कृतज्ञता सोहळा’ हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला जात आहे.महाराष्ट्रातील…

अधिक बातमी वाचा...

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा निमित्त जनता दरबार..

परंडा(माझं गांव माझं शहर) राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा परंडा वतीने जनता दरबारचे आयोजन वाकडी, ता. परंडा येथे करण्यात आले होते.भारतीय जनता पार्टी च्या वतीने जनता दरबार @३ नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटात वाकडी येथे श्री राम मंदिर परिसरात…

अधिक बातमी वाचा...

अनाळा येथील भाजपाच्या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद..

परंडा:- भारतीय जनता पार्टी च्या वतीने जनता दरबार@२ नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील अनाळा जिल्हा परिषद गटात अनाळा येथे ग्राम पंचायत सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी १८९ लेखी तक्रारींची दखल घेतली तर काही तक्रारींची भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!