📰 परंडा तालुक्यात वाढत्या लोडशेडिंगविरोधात शेतकऱ्यांचा संताप; महावितरण कार्यालयात धडक

परंडा (तानाजी घोडके) : परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पाणीपुरवठा व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालय गाठत प्रशासनाशी थेट चर्चा केली. या वेळी उपस्थित…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी विशेष सभेची मागणी.

परंडा (माझं गांव माझं शहर): परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परंडा नगरपरिषदेमधील जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत नगरपरिषदेची तात्काळ विशेष सभा घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आज नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले….

अधिक बातमी वाचा...

पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद; पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळे

माझं गांव माझं शहर, दि.२७(पुणे) :पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांनी देशभरातील पत्रकारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “पत्रकार…

अधिक बातमी वाचा...

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 प्रारंभ

परंडा दि.२९(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर बु. येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डॅा. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात रंगला भव्य कुस्तीचाआखाडा : तीन लाखांचे पटकावले पारितोषिक; कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा,दि.२९ (माझं गांव माझं शहर) राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे शनिवारी (दि. २८) रोजी राज्यस्तरीय कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगला. अंतिम चार लाख रुपयांच्या कुस्तीत मैदानाचे मुख्य आकर्षण असलेला डब्बल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर (नाशिक) व साहील कोहली यांच्यात झालेल्या तुल्यबळ आटीतटीच्या लढतीनंतर कुस्ती बरोबरीत सुटली.तर क्रमांक दोनच्या…

अधिक बातमी वाचा...

संगणक शिक्षण हे आधुनिक जीवनाचे भक्कम आधारस्तंभ असून, “संगणक कोर्सेस – काळाची खरी गरज”

परंडा(संपादकीय) आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात संगणक शिक्षण हे केवळ एक पर्याय राहिलेले नाही, तर ती प्रत्येकासाठी अत्यावश्यक गरज बनली आहे. शासनाच्या विविध योजना, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक प्रक्रिया, नोकरीच्या संधी आणि व्यवसाय व्यवस्थापन – या सर्व क्षेत्रांत संगणकाचे ज्ञान अनिवार्य झाले आहे. ग्रामीण भागातही आता डिजिटल क्रांती पोहोचली असून, ऑनलाइन सेवा, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल व्यवहारांचा…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे यांचा सत्कार..

माझं गांव माझं शहर, दि.२८(प्रतिनिधी)धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी श्री. भाऊसाहेब खरसडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या..यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जेष्ठ विधीज्ञ श्री. दादासाहेब खरसडे, श्री. डॉ. दशरथ घोगरे, श्री. अंकुश मुळीक सर,…

अधिक बातमी वाचा...

📰 परंडा तालुक्यात संतापजनक घटना : दलित शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड, ४५ हजारांचे नुकसान; ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल

माझं गांव माझं शहर, दि.२७(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याच्या शेतीवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावची शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करण्यात आली. यामध्ये सुमारे ४५ हजार रुपयांचे…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात महा ई-सेवा केंद्रांकडून अधिक शुल्क आकारणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.

माझं गांव माझं शहर, दि.२७ (प्रतिनिधी ) परंडा शहर व तालुक्यात कार्यरत असलेल्या महा ई-सेवा केंद्र चालकांकडून शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उत्पन्न, जात, नॉन-क्रीमी लेयर, EWS, अंत्योदय रेशनकार्ड तसेच संजय गांधी व निराधार योजनांशी संबंधित…

अधिक बातमी वाचा...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ केवळ दिखावा ? शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित!”स्थळ पाहणी करूनही कारवाई नाही; बांधावरील रस्त्यांसाठी शेतकरी संतप्त

परंडा (प्रतिनिधी):राज्यात मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी राबविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात या शिबिरांचे स्वरूप केवळ नावापुरतेच मर्यादित असल्याचे चित्र ग्रामीण भागात स्पष्टपणे दिसून येत आहे.परंडा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी वर्षानुवर्षे सर्वे नंबरनुसार बांधावरून रस्ता मिळावा या मागणीसाठी शासन…

अधिक बातमी वाचा...

बाजार समिती कळंबचा कारभार स्वच्छ; ४६ गाळे खुले लिलावानेच देणार सभापती शिवाजी कापसे

कळंब (अमर चोंदे) – कृषि उत्पन्न बाजार समिती कळंब येथे ४६ गाळ्यांचे वाटप परस्पर करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात असून त्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचा खुलासा बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी केला आहे. बाजार समितीचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून कोणताही गाळा अद्याप कोणालाही वाटप करण्यात आलेला नाही, असे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दि….

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात श्रीराम नवमी निमित्त भाजपकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन.

परंडा (प्रतिनिधी): श्रीराम नवमी निमित्त परंडा शहरात भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.शहरातील विविध भागातून निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भगवान श्रीरामांच्या प्रतिमेसह आकर्षक सजावट केलेले रथ, ढोल-ताशांच्या गजरात आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शोभायात्रेचा मार्ग शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आला…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!