देवगाव (बु ) येथील नागरिक साथीच्या आजाराने बेजार : गावातील एकमेव हातपंप घाणीच्या विळख्यात

परंडा (माझं गांव माझं शहर) :- परंडा तालुक्यातील देवगाव (बु) येथील नागरिक हे गेल्या अनेक दिवसापासून सर्दी ,खोकला ,ताप व उलट्या होणे या व्याधीने बेजार झाले आहेत ,याला एकमेव कारण म्हणजे गावातील अशुद्ध पाणी ,देवगाव (बु ) येथे एकूण पाच हात पंप आहेत त्यापैकी कदम वस्ती येथील एकमेव हातपंप हा पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्या…

अधिक बातमी वाचा...

खासापुरी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे बावची-सोनगिरी रस्त्यावरील पूल बंद.

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यात दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे साकत धरण व खासापुरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे अनेक खेडेगावाचा संपर्क तुटला आहे. परंडा तालुक्यातील बावची रोडवरील फुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्याचबरोबर ते पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वाहून जाते सध्या बार्शी परांडा रोडवरील सोनगिरी पुलावरून देखील पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत आहे. सर्व…

अधिक बातमी वाचा...

स्मशानभूमीची जमीन म्हाडाला दिल्याने जेवळी येथे आमरण उपोषण वंचित बहुजन आघाडीने दिली भेट.

लोहारा(प्रतिनिधी)जेवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथील लिंगायत स्मशानभूमीची जमीन अनाधिकृतपणे वृक्षरोपणासाठी म्हाडाला देण्यात आली या विरोधात श्यामसुंदर तोडकरी यांच्या सह सहकार्यांनी अमरून उपोषण सुरू केले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहिर पाठिंबा देण्यात आला त्याचबरोबर प्रशासनाला आपली विनंती मान्य करण्यास भाग पाडू असा विश्वास पक्षाच्या वतीने दिला. जेवळी तालुका लोहारा जिल्हा…

अधिक बातमी वाचा...

आर.पी.आय परंडा च्या वतीने नवनियुक्त पी.आय आसाराम चोरमले यांचा सत्कार..!

परंडा(तानाजी घोडके) येथील पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पी.आय म्हणून श्री आसाराम चोरमले यांची नियुक्ती झाल्याबद्दल व  परंडा पोलीस स्टेशनचे सध्याचे कार्यरत पी .आय दिलिपकुमार पारेकर यांचे प्रमोशन झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित एडवोकेट जाहीर चौधरी माजी तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे माजी तालुकाध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...

उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी भूम या पदावर नवनियुक्त मा. डोंगरे (भा.प्र.से )यांनी घेतला चार्ज..!

भूम (प्रतिनिधी) भूम येथील उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांची बदली झाल्यामुळे या पदाचा चार्ज भूम येथील तहसीलदार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवस गेल्यानंतर या पदावर मा. डोंगरे यांची नियुक्ती झाली दि 8 ऑगस्ट 2025 रोजी पदभार स्वीकारला. भूम , परंडा , वाशी तालुक्यातील अनेक प्रश्न समस्या सोडवण्यासाठी कोणती रणनीती आखणार याकडे…

अधिक बातमी वाचा...

चर्मकार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात यशस्वी बैठक संपन्न!

मुंबई(प्रतिनिधी )चर्मकार समाजातील नागरिकांच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन अत्यंत सकारात्मक असून, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी चर्मकार समाजाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत दिली. या बैठकीस माजी खासदार राहुल शेवाळे, समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, संत…

अधिक बातमी वाचा...

बावची रस्त्याची दुरावस्था ! शाळा, महाविद्यालय, आय टी आय विद्यार्थ्यांची , ज्येष्ठ नागरिक शिक्षक यांची सकाळची सुरुवात चिखलात?

परंडा (प्रतिनिधी) शहरातील बावची रोड या ठिकाणी महाराणा प्रताप सिंह चौक ते शांतीनगर या रोडचे काम चालू असल्याने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही.खाजगी मालकीच्या जमिनीतून रस्ता आहे परंतु रिमझिम पावसाळ्याच्या दिवसात खुप चिखल झाला आहे ,विद्यार्थ्यांना व नागरिकांना चिखलातून खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे पर्यायी…

अधिक बातमी वाचा...

जेष्ठ विधिज्ञ ॲड .दादासाहेब ( बापू ) खरसडे यांच्या वकीली कार्यकालास ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परंडा येथे सत्कार.

परंडा : जि.प.चे माजी उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ ॲड .दादासाहेब खरसडे यांच्या वकीली सेवा कार्यकालास ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परंडा विधिज्ञ मंडळाच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र परंडा न्यायाधीश डॉ.एफ.ए.एम. ख्वाजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विधीतज्ञ संघातील वकील अध्यक्ष उपाध्यक्ष व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

अधिक बातमी वाचा...

खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडवे~रणजित पाटील

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडणे बाबतचे चे निवदेन दि ०४/०८/२०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी मा. उपविभागीय अधिकारी ‘ धाराशिव पाटबंधारे उपविभाग क्र ४ परंडा व मा . शाखा अभियंता सिंचन शाखा क्र.१५ परंडा ता. परंडा यांना दिले आहे.निवदेनात म्हटले आहे की परंडा…

अधिक बातमी वाचा...

शालेय विद्यार्थ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये इंग्रजी विषया साठी स्पेलिंग बी स्पर्धांचे आयोजन.

धाराशिव(प्रतिनिधी) जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषया साठी स्पेलिंग बी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जून व जुलै महिन्यात शाळा स्तरावर प्रत्येक शनिवारी या स्पेलिंग बी शब्दांचा सराव घेण्यात आला असून शाळा स्तरावर दिनांक…

अधिक बातमी वाचा...

बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सिद्धी शिंदेचा शाळेत सत्कार..

परंडा (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशन व धाराशिव जिल्हा चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी सिद्धी महेश शिंदे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल विद्यालयात सिद्धीचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर…

अधिक बातमी वाचा...

ग्लोबलमध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

परंडा(प्रतिनिधी) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्लोबलच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव शिवमती आशाताई मोरजकर उपस्थित होत्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी, पोवाडे, कवी लेखन, कविता संग्रह ,लघु कथा, पटनाट्य आदी साहित्य हे समाजाच्या उद्धारासाठी प्रसिद्ध केले. त्याचबरोबर…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!