स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व शक्तीनिशी लढणार- ॲड.प्रणित डिकले
धाराशिव/कळंब (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी कळंब व धाराशिव तालुका पक्ष संघटन आढावा बैठक दि.२७ रोजी संप्पन झाली जिल्हाध्यक्ष ॲड.प्रणित डिकले,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न.संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी पक्षाची धाराशिव व कळंब तालुका संघटनात्मक बांधणी पक्षाची ताकद संपूर्ण आढावा याप्रसंगी घेण्यात आला.धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहामध्ये धाराशिव तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक…
