पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याच्या, खोट्या कारवाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परंडा येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने निवेदन सादर..
परंडा(प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून समाजातील घडामोडी, जनहिताचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रामाणिकपणे जनतेपर्यंत आम्ही पोहोचवत आहे.परंतु अलीकडील काळात आमच्यावर अन्याय, दडपशाही व खोट्या आरोपांचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी अवैध धंदे बाबत भूम येथील पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांनी स्थानिक पोलिसांना प्रश्न केला तेंव्हा तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करता का म्हणत एनसी दाखल…