“समाजाशी सातत्यपूर्ण संवादातूनच सक्षम नेतृत्व घडते”- उमेदवार शरद पवार
परंडा (प्रतिनिधी) :“समाजाशी सातत्यपूर्ण संवादातूनच सक्षम नेतृत्व घडते,” असे प्रतिपादन करत भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार शरद पवार यांनी आपल्या निवडणूक प्रचारात थेट जनसंवादाला प्राधान्य दिले आहे. गावागावात भेटी देत, घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत मतदारांच्या समस्या समजून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची प्रमुख यंत्रणा असल्याने स्थानिक प्रश्नांची जाण असलेले…
