आरोग्यविषयक समस्या जिल्हा परिषदेमार्फत मार्गी लावणार : जि.प. सदस्य धनंजय सावंत यांची ग्वाही

परंडा(प्रतिनिधी ) “आरोग्य विभागातील समस्या तत्काळ सोडवून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल,” अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी दिली.

जवळा येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, अपुऱ्या सुविधा तसेच औषध उपलब्धतेबाबत चर्चा करण्यात आली.

सावंत यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत व योग्य आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनीही जबाबदारीने काम करून नागरिकांचा विश्वास जपावा, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळाची कमतरता, औषध तुटवडा व इतर अडचणी मांडल्या. त्यावर जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!