खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने १५० पूरग्रस्तांची सुखरूप सुटका
परंडा(तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण परिसरात आज आलेल्या भीषण पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल १५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. जीव धोक्यात घालून करण्यात आलेल्या या यशस्वी बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. खासदार निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वाघेगव्हाण परिसरात पुरामुळे…
