जिल्हा परिषद निवडणूक धाराशिव जिल्ह्यात ५५ गट प्रारूप प्रभाग सूचना जाहीर.
परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जाहीर केली असून 55 गट अर्थात सदस्य संख्या असणार आहे, या रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन ११ ऑगस्टला निर्णय घेऊन अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करतील…