पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 प्रारंभ

परंडा दि.२९(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर बु. येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डॅा. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात रंगला भव्य कुस्तीचाआखाडा : तीन लाखांचे पटकावले पारितोषिक; कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा,दि.२९ (माझं गांव माझं शहर) राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे शनिवारी (दि. २८) रोजी राज्यस्तरीय कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगला. अंतिम चार लाख रुपयांच्या कुस्तीत मैदानाचे मुख्य आकर्षण असलेला डब्बल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर (नाशिक) व साहील कोहली यांच्यात झालेल्या तुल्यबळ आटीतटीच्या लढतीनंतर कुस्ती बरोबरीत सुटली.तर क्रमांक दोनच्या…

अधिक बातमी वाचा...

पंचायत समितीसमोरील रस्ता तात्काळ खुला करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

धाराशिव दि.२७(माझं गांव माझं शहर): पंचायत समिती परिसरातून समता नगरकडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करावा, अन्यथा आडवे टाकलेले सिमेंट पोल उखडून टाकण्यात येतील, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. धाराशिव नगर परिषद हद्दीतील सर्व्हे क्रमांक 145 मधून जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा 12 मीटर रुंदीचा रस्ता असून, तो पंचायत समितीच्या क्वार्टरसमोरून जातो. गेल्या…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जात पडताळणी कार्यालयाचा कारभार रामभरोसे; नागरिकांना जमिनीवर बसण्याची वेळ

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात नागरिकांना अत्यंत गैरसोयींचा सामना करावा लागत असून, मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी कार्यालयात बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याने वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसण्याची वेळ येत आहे. कार्यालयातील टेबल व बाकडे मोडकळीस आले असून…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात महा ई-सेवा केंद्रांकडून अधिक शुल्क आकारणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.

माझं गांव माझं शहर, दि.२७ (प्रतिनिधी ) परंडा शहर व तालुक्यात कार्यरत असलेल्या महा ई-सेवा केंद्र चालकांकडून शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उत्पन्न, जात, नॉन-क्रीमी लेयर, EWS, अंत्योदय रेशनकार्ड तसेच संजय गांधी व निराधार योजनांशी संबंधित…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे श्री रामनवमीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी च्या वतीने भव्य भगवा ध्वज यात्रा.!

परंडा दि.२६ (माझं गांव माझं शहर) शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथे मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब, युवा नेते मल्हार दादा पाटील, जि.प. सदस्य धनंजय दादा सावंत यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन करून या दिव्य सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. हा क्षण केवळ रॅलीचा प्रारंभ नव्हता, तर श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा साक्षीदार ठरला. “जय श्रीराम” च्या गजरात…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात शेतरस्त्यासाठी दिव्यांग शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा

धाराशिव, दि. 23 मार्च 2026 — शेतात जाण्यासाठी आवश्यक रस्ता मिळावा या मागणीसाठी स्थानिक दिव्यांग शेतकरी नारायण हनुमंत साखरे यांनी प्रशासनाला इशारा दिला असून, मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात साखरे यांनी नमूद केले आहे की, त्यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय, धाराशिव येथे शेतरस्त्यासाठी अर्ज…

अधिक बातमी वाचा...

आलेश्र्वर ता. परंडा ग्रामपंचायचे तत्कालीन ग्रामसेवकाला १० हजार रुपयांचा दंड .

परंडा: माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न देणे आणि वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशांचे उल्लंघन करणे परंडा तालुक्यातील आलेश्र्वर ग्रामपंचायत चे तत्कालीन ग्रामसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाने याप्रकरणी कडक पाऊल उचलत संबंधित ग्रामसेवकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.यासंबंधी मिळालेली माहिती अशी कीफारूक बादशहा मुलानी यांनी ३० डिसेंबर २०२२ रोजी माहिती अधिकार…

अधिक बातमी वाचा...

भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या माजी सरपंचाला प्रशासक पदावर न ठेवणेबाबत ; माहिती अधिकार कार्यकर्ताने मुख्यामत्र्यांना दिले निवेदन.

ग्रामस्थांचा विरोध का?ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर लोकशाही मार्गाने नवीन प्रशासकाची नियुक्ती करताना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला प्राधान्य मिळणे अपेक्षित असते. मात्र, ज्यांनी यापूर्वीच पदाचा गैरवापर करून गावाचे नुकसान केले आहे, त्यांनाच पुन्हा प्रशासक म्हणून नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्हात आहे.“ज्यांच्यावर वसुलीची टांगती तलवार आहे, ते गावाचा विकास काय करणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.प्रशासनाला इशारा:या…

अधिक बातमी वाचा...

कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

कळंब(माझं गांव माझं शहर) शहरात मागील काही दिवसांपासून गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या काही जणांनी शहरातील एका हॉटेलमध्ये घुसून दहशत माजवत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच जेवणासाठी आलेल्या एका युवकावर वजनदार वस्तूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

अधिक बातमी वाचा...

स्वयंम शिक्षण प्रयोग एलआयसी व एच एफ एल यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथे महिला मेळावा संपन्न .

परंडा दि . 10 – जागतिक महिला दिनानिमित्त परंडा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग व एलआयसी एच एफ एल प्रकल्प अंतर्गत दि . १० रोजी एमटेक सभागृहात महिला मेळावा संपन्न झाला . प्रारंभी सावित्रीबाई फुले व स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका प्रेमागोपालन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अनिवार्य; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचे जाहीर आवाहन

धाराशिव : विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालय धाराशिवच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी जाहीर आवाहन केले आहे.शासनाच्या निर्देशानुसार : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!