भोंजा हवेली येथे मोफत रब्बी हंगामातील ज्वारी बियाणे २५ शेतकऱ्यांना वाटप

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांना परंडा तालुका कृषी अधिकारी श्री नानासाहेब लांडगे, कृषी अधिकारी श्री मनोज पाटील, AO अधिकारी श्री बिभिषण. हांगे, मंडळ अधिकारी संभाजीराजे माळी, सहायक कृषी अधिकारी विनोद भाग्यवंत, तालुका समन्वयक अमोल पाटील, डायरेक्टर गणेशदादा नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांना रब्बी हंगामातील बियाणे देण्यात आले तसेच सोबत…

अधिक बातमी वाचा...

अखंड हरीनाम सप्ताहानिमित्त पांढरेवाडी (पश्चिम) येथे भव्य रक्तदान शिबिर ; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग!

परंडा, दि. २८ (प्रतिनिधी) – तालुक्यातील पांढरेवाडी (पश्चिम) येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी आणि भक्तीचा संगम साधत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक शरद अभिमान भिल्लारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार राहूल शिंदे, शिवाजी शिंदे, गणेश शिंदे,सुभाष भिल्लारे, शरद भिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते….

अधिक बातमी वाचा...

समाजसेवक अनिल शिंदे, विजय खरात यांच्या विशेष प्रयत्नातुन ५०० पुरग्रस्त व गरजुना मदत.

अनाळा(प्रतिनिधी पुणे पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील विवीध पुरग्रस्त गावातील गरजुना 400 अन्नधान्याच्या किटसह शालेय विद्यार्थ्यांना तीन हजार ड्रेससह ५०० तरुनांना टि शर्टचे वाटप करण्यात आले या बाबत सविस्तर माहिती अशी की पुणे येथील पुणे शहर पाणी पुरवठा संघटनेच्या वतीने नंदकुमार जगताप विजय भाऊ अल्हाट व विक्रमजी पाटुळे यांच्या सहकार्याने व समाजसेवक अनिल भाऊ…

अधिक बातमी वाचा...

मदारी समाजातील व शेतमजूर गरीब लोकांना आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत यांच्यातर्फे दिवाळी फराळाचे वाटप..

परंडा (प्रतिनिधी)मतदारसंघातील महा भयंकर नैसर्गिक आपत्तीचे संकटातून उद्भवलेली महापूर परस्थीतीने शेतकरी व शेतमजुरांचा संसार कोलमडला, जगण्याची भ्रांत झाली मतदारसंघाचे आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत तथा मा.आरोग्य मंत्री तात्काळ मदतीला धावून आले. अत्यावश्यक सर्व मदत प्रशासनाशी समन्वय साधून मायेचा आधार दिला, तशाच दिपावली सारखा महत्त्वाचा सण आला, व शेतकरी, शेतमजूर, दिन दलित, गरीब जनतेच्या प्रेमापोटी दिपावलीचा…

अधिक बातमी वाचा...

पत्रकार गणेश वाघमोडे यांनी केली पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी

परंडा(प्रतिनिधी) पत्रकार गणेश वाघमोडे यांनी यंदाची दिवाळी पूरग्रस्तांसोबत साजरी करण्यात निर्णय घेतला होता. वाघमोडे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना गृहपयोगी साहित्य आणि फराळ देऊन यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. वाघमोडे यांनी वैयक्तिक स्तरावर हा उपक्रम हाती घेऊन पूरग्रस्त कुटुंबांना प्रभावित केले. धाराशिव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महापुराचा सर्वाधिक फटका परंडा…

अधिक बातमी वाचा...

आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

परंडा (प्रतिनिधी) आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने शेतीसह सर्वच उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पाषाण पुणे यांच्या सहकार्याने परंडा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आधार सामाजिक संस्थेच्या वतीने परंडा तालुक्यातील 600 पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.समाजातील…

अधिक बातमी वाचा...

खर्डा ग्रामस्थांचा माणुसकीचा हात; तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते ‘दिवाळी फराळ किट’चे वाटप

परंडा (माझं गांव माझं शहर) : (दि. १५ ऑक्टोबर) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे परंडा तालुक्यातील अनेक कुटुंबांच्या घरात अंधार दाटला असताना, खर्डा येथील ग्रामस्थांनी ‘आपुलकीचा शेजारी धर्म’ जपून या पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘आपुलकीचा फराळ’ या उपक्रमांतर्गत खर्डा व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले फराळाचे बॉक्स परंडा…

अधिक बातमी वाचा...

डोंजा जिल्हा परिषद गटात जनतेचा उमेदवार म्हणून हरीचंद्र ( बापू ) मिस्कीन यांची जोरदार मागणी.

परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील डोंजा सिनाकोळेगाव धरण क्षेत्रातील विकास कामांपासून ते ग्रामपातळीवरील जनतेच्या अडीअडचणींपर्यंत नेहमीच सक्रिय राहून लोकसेवेची परंपरा जपणारे हरीचंद्र (बापू ) महादेवराव मिस्कीन हे नाव आज डोंजा जिल्हा परिषद गटात जनतेच्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोळेगाव-सिना धरणाच्यावेळी त्यांचे वडील महादेव आप्पा मिस्कीन सरपंच पदावर असताना त्यांनी धरणग्रस्त गावांचे पुनर्वसन, सोयीसुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत…

अधिक बातमी वाचा...

मा.मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील व मा.खासदार शिवाजीराव पाटील पुरग्रस्त गावातील दिव्यांगाच्या मदतीला आले धाऊन ..

परंडा (दि१५ ऑक्टोंबर)परंडा तालुक्यातील पुरग्रस्त वागेगव्हाण,नालगाव,लोणी येशील दिव्यांगांना दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके व संस्थेच्या सचिव सोनाली घोडके यांच्या हस्ते जिवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करूनदिव्यांगाना मदतीचा हात दिला आहे. परंडा तालुक्यातील महापूराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या दिव्यांगाच्या पाठीशी दिव्यांगउद्योग समूह ही सामाजिक संघटना उभी राहिली आसून तहसीलदार निलेश काकडे यांच्या सहकार्याने व…

अधिक बातमी वाचा...

कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक किट वाटपाचा शुभारंभ

धाराशिव(माझं गांव माझं शहर) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांसाठी कोटक बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या किट असलेल्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून या मदतकार्याचा शुभारंभ करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे….

अधिक बातमी वाचा...

पुरग्रस्त मजूर वंचित यांना जीवन आवश्यक किटचे वाटप.

परंडा(माझं गांव माझं शहर ) तालुक्यातील मौजे शेळगाव माणिक नगर, खासापुरी येथील वंचित, मंजूर दलित घटकातील एकुण 150 कुटुंबाना जिवन आवश्यक किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये दैनंदीन जीवना मध्ये लागणाऱ्या वस्तुंचा समावेश होता. सदरील किटची मदत दिलीप वळसे पाटील व मा . खा . शिवाजी आढळराव पाटील मंचर आंबेगाव यांच्या वतीने करण्यात आली असुन या…

अधिक बातमी वाचा...

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थान समितीचा मदतीचा हात

धाराशिव : (प्रतिनिधी) सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटकाळात मदतीचा हात पुढे करत श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान समितीने पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. भूम तालुक्यातील सोनगिरी वस्ती, साबळेवाडी, आणि पांढरेवाडी या गावांना पुराचा सर्वाधिक फटका…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!