धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना पुणेकर युवकांचा मदतीचा हात.!

परंडा(तानाजी घोडके)महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील युवक जे सध्या पुणे येथे नोकरी आणि शिक्षण घेत आहेत अश्या काही युवकांनी आपल्या समाजाला काहीतरी देणं लागत या उदार हेतूने त्यांनी सुरू केलेल्या आपुलकी सोशल फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि जीव फाउंडेशन पुणे व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने परांडा तालुक्यातील आवारपिंपरी आणि शिराळा येथील पूरग्रस्त कुटुंबांना तसेच,…

अधिक बातमी वाचा...

भाजपच्या वतीने देवगाव येथील पशुपालक शेतकरी बांधवांना चारा वाटप..

परंडा:- महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री. संजय (बाळा) भेगडे व भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश भेगडे यांच्या संकल्पनेतून पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था व भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्यातील देवगाव (खु) येथे पशुपालक शेतकरी बांधवांना चारा वाटप करण्यात आला. धाराशिव जिल्हात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव व पशु यांचे…

अधिक बातमी वाचा...

स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा पूरग्रस्तांच्या दुःखांना मोठं समजणारा संवेदनशील मनाचा अधिकारी- मा.मैनक घोष

धाराशिव (तानाजी घोडके) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मैनक घोष यांचे वडील कैलासवासी माणिकराव घोष यांचे आजाराने दुःखद निधन झाले. वडिलांना सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव या ठिकाणी तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले परंतु आजारपणामुळे वडिलांचे दुःखद निधन झाले. घोष  हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी…

अधिक बातमी वाचा...

पूरग्रस्तांसाठी तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट कडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सरसवली आहे तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिली आहे.परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून अनेक दानशूर मदतीला पुढे येत आहेत…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” उपजिल्हा रुग्णालय परंडा

परंडा:- राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे महिलांना विविध प्रकारच्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” उपजिल्हा रुग्णालय परंडा च्या वतीने महिलांच्या स्तनाचे कर्करोग,…

अधिक बातमी वाचा...

अतिक उर्फ पप्पू पठाण यांच्यातर्फे पूरग्रस्त लोकांना २५० जीवनावश्यक वस्तूचे वाटप.

परंडा दि.२७ (प्रतिनिधी) सध्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी महापूर आल्याने अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.अनेक गावामध्ये पावसाचे पाणी जाऊन घरातील खाण्याची राहण्याची अत्यावश्यक सर्व वस्तू मुसळधार पावसाने वाहून गेले आहे संपूर्ण घर पावसामध्ये असल्याने लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. तेव्हा अशा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!