कंत्राटदार, बेरोजगार अभियंता, मजूर संस्थांची 89 हजार कोटींची देयके रखडली
धाराशिव -(प्रतिनिधी) राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, हॉट मिक्सधारक कंत्राटदार, मजुर संस्था आणि विकासक यांची विविध विभागाकडील 89 हजार कोटींची देयके रखडली आहेत. ही देयके तातडीने देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी मागणीचे निवेदन देण्यात आले….
