वडिलांचे छत्र हरपलेल्या कन्येने पोलीस भरतीत यश मिळवत आईचे स्वप्न केले साकार

परंडा | माझं गावं माझं शहर

परंडा येथील भटक्या समाजातील वैदू समाजाची कन्या कु. गौरी सुभाष घोरपडे हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवून आपल्या आईचे स्वप्न साकार केले आहे. तिची महाराष्ट्र पोलीस दलात नवी मुंबई येथे निवड झाली असून, तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

गौरीच्या आयुष्यात वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. प्रतिकूल परिस्थितीत तिच्या आईने डोक्यावर टोपले घेऊन प्लास्टिकचे साहित्य विकत मुलीचे शिक्षण पूर्ण केले. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी गौरीने अथक परिश्रम घेतले आणि पोलीस भरतीचे स्वप्न साकार करत यशाला गवसणी घातली.

यावेळी नगरसेवक सत्तार पठाण, वाजीद दखनी, रत्नकांत शिंदे, बाबू जिनेरी, तन्वीर मुजावर, माजी उपनगराध्यक्ष मुसा हन्नुरे, माजी नगरसेवक जावेद पठाण, इरफान शेख, संजय घाडगे, अॅड. संतोष शेळके, सनी राशनकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता रणभोर, दिलीप रणभोर, लक्ष्मीकांत बनसोडे, नाजीम मुजावर, महमूद पठाण, मदन दीक्षित, आसिफ शेख, नवाज शेख, तय्यब पठाण, कयूम तुटके, फैजू चौधरी, अमित जोशी, रवि भिस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच वैदू समाजातील शाम घोरपडे, वसंत घोरपडे, गोविंद शिंदे, विलास शिंदे, वामन शिंदे, बाबा शिंदे, अनिल शिंदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौरी घोरपडे हिच्या यशामुळे वैदू समाजासह संपूर्ण परंडा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!