मराठवाडा मित्रपरिवार पुणे आयोजित माता-पिता गौरव पुरस्काराने पवार दांपत्याचा सन्मान

पुणे | प्रतिनिधी

मराठवाडा मित्रपरिवार पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “यशस्वी उद्योजकांच्या आई-वडिलांचा गौरव सोहळा” उत्साहात संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमामध्ये परंडा तालुक्यातील यशस्वी उद्योजक रामभाऊ पवार यांच्या आई-वडिलांची गौरवासाठी निवड करण्यात आली होती.

एमआयटी, पुणे येथे आयोजित या भव्य सोहळ्यात भगवान बाबुराव पवार आणि शालन भगवान पवार या दांपत्यांचा “माता-पिता पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीतही मुलांना शिक्षण देत संस्कारांची शिदोरी दिल्याबद्दल आणि संघर्षातून यशस्वी उद्योजक घडवल्याबद्दल पवार दांपत्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. त्यांच्या जिद्द, कष्ट आणि त्यागाचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी पवार कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मराठवाड्यातील अनेक यशस्वी उद्योजकांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.

या सन्मानामुळे पवार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!