परांड्यात विशेष दिव्यांग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

३२ अस्थिव्यंग दिव्यांगांची तपासणी

परंडा| माझं गांव माझं शहर

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव, उपजिल्हा रुग्णालय परांडा आणि दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने परांडा येथे विशेष दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २३ मे २०२६ रोजी करण्यात आले.

दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये अस्थिव्यंग असलेल्या ३२ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

यावेळी विशेषतज्ञ डॉक्टर कृष्णा स्वामी यांनी उपस्थित राहून दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी केली तसेच आवश्यक मार्गदर्शनही केले. शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना प्रमाणपत्र व इतर शासकीय सुविधांसाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ होण्यास मदत झाली.

या प्रसंगी दिव्यांग बांधवांसह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!