शिवाजी कोण होता…? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा येथे सामूहिक वाचन

परंडा दि . २७ : – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा येथे शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाचन करण्यात आले.
कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा या पुस्तकांमधून त्यांनी मांडली पण इथल्या काही लोकांनी महापुरुषां चे विचार स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले आहे, हे षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाने केले आहे.
“शिवाजी कोण होता?”
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कॉ.गोंविद पानसरे लिखित असलेले शिवाजी कोण होता ? या पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी अर्वाचे शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा येथे निषेध व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे सामूहिक वाचन चौकाचौकामध्ये करा या आव्हानास प्रतिसाद देत परंडा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी कोण होता? या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे शहराध्यक्ष किरण बनसोडे तालुका महासचिव विलास जाधव ज्येष्ठ साहित्यिक तु . दा . गंगावणे माजी नगरसेवक राहुल बनसोडे फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक डॉ.अनंत देडगे घनश्याम शिंदे नवनाथ गावडे रामदास थिटे पोपट बनसोडे उपस्थित होते.

error: Content is protected !!