📰 माझं गाव माझं शहर | परंडा तालुक्यातील कुंभेजा परिसरात कॅनल पट्टीवर राहणाऱ्या वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला करून दहशत निर्माण केल्याची घटना दि.२५ रोजी रात्री घडली हे समोर आली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी घरांवर दरड टाकत मुद्देमाल व रोख रक्कम सहजरीत्या चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे.
या हल्ल्यात एका व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून प्राथमिक चौकशी करण्यात आली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षेची मागणी केली आहे.
