📰 माझं गाव माझं शहर |परंडा (प्रतिनिधी): तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबत गंभीर तक्रार समोर आली असून, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात इसुब अमीन पठाण यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे.
सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात असून, वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच वय प्रमाणपत्र घेण्यासाठी गेल्यानंतर माहिती मागितल्यानंतर तुम्ही माझ्या कामांमध्ये अडथळा आणता तुमच्यावर ३५३ गुन्हा नोंद करतो ,अर्वाच्य भाषांमध्ये बोलणे,माझे काय करू शकत नाही, असे प्रकार या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घडतात तसेच काही वेळा डॉक्टर अनुपस्थित असणे किंवा रुग्णांना आवश्यक सेवा न मिळणे, अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तक्रारदाराच्या मते, संबंधित मोरे आनंद डॉक्टर हे खाजगी दवाखाना चालवतात खाजगी दवाखान्यांमध्ये घडलेले प्रकार हे सरकारी उपजिल्हा रुग्णालयात येताना डोक्यावर घेऊन येतात की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित प्रकारांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व जबाबदार पद्धतीने देण्यात याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
