सिरसाव येथे अवकाळी पावसाचा तडाखा; ९ एकर पपई बाग जमीनदोस्त

माझं गांव माझं शहर | परंडा तालुक्यातील मौजे सिरसाव येथे दि २२ रोजी अचानक आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले. या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकरी तानाजी मिसाळ यांच्या शेतातील सुमारे ९ एकर क्षेत्रावरील पपई बाग पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. वादळी वाऱ्याच्या जोरामुळे पपईची झाडे मुळासकट उखडून पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या पावसाचा फटका केवळ पिकांपुरता मर्यादित न राहता परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे तसेच पशुधनाचेही नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी वर्गात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, हंगामावरच पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी व नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
— माझं गांव माझं शहर | परंडा

error: Content is protected !!