स्पर्धेच्या युगात संस्कार आणि वाचनाची जोड आवश्यक – ह.भ.प.ईश्वर ईटकर महाराज

माझं गाव माझं शहर | परंडा प्रतिनिधी, दि. २० आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित अक्षरगंगा व मंथन परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ह.भ.प. ईश्वर ईटकर महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ शालेय शिक्षण पुरेसे नसून संस्कारांची जोड तितकीच महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. वाचनामुळे मन समृद्ध होते, त्यामुळे पालकांनी व मुलांनी मोबाईलपासून दूर राहून वाचनाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक सचिवा सौ. प्रियंका क्षिरसागर, गणित तज्ञ महेश शिंदे तसेच गिरवले सर उपस्थित होते.

या प्रसंगी शाळेतील स्वरा गायकवाड, किरण अनाळकर, येसु क्षिरसागर, शरयु चव्हाण, प्रत्युश काळे, शिवराज क्षिरसागर, आर्णव देशमुख, दुर्वा देशमुख, आरोही कदम, प्रिया गायकवाड, राजवीर जगताप, अनुष्का भोसले, राधा तांबारे, वेदांश तांबारे, जान्हवी जेकटे, आरोही जेकटे या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा तसेच केंद्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

तसेच रॉयल पब्लिक स्कूलने अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले आहे.

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. जगताप सर तसेच शिक्षिका श्रीमती करिश्मा शेख, प्रिया देशमुख, श्री. घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमास तानाजी अनाळकर, दीपक बिडवे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. हनुमंत जगताप, श्री. अशोक घाडगे, श्रीमती उषा क्षिरसागर, कविता जगताप, श्वेता क्षिरसागर, ज्योती शिंदे, पूजा गरड, रुतुजा बोंद्रे, करिश्मा शेख आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!