परंडा, माझं गांव माझं शहर (दि :१४ एप्रिल) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.१४ एप्रिल रोजी पहाटे १२:०५ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यक्रमाची जल्लोषात सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के तसेच फुले-आंबेडकर विद्वतसभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तु.दा.गंगावणे,जिल्हा उपाध्यक्ष मोहनदादा बनसोडे,तालुकाध्यक्ष संतोष हिवरे,शहराध्यक्ष किरण बनसोडे,फुले-आंबेडकर विद्वत जिल्हा समन्वयक डॉ.अनंत देडगे,नगरसेवक रमेश परदेशी,नगरसेवक राहुल बनसोडे तसेच वंचित बहुजन आघाडी आयोजित क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६ समितीचे अध्यक्ष विलास जाधव,उपाध्यक्ष नवनाथ गावडे,मुख्तार हावरे,अरुण सोनवणे,रमेश आवाळे,किशोर गायकवाड,योगेश आवाळे,हवळे मेजर बाळासाहेब बोकेफोडे,निवांत गायकवाड, हरीश पवार,राहुल बनसोडे,संतोष देशमुख जोशी यांच्यासह निलोफर बनसोडे,दिपाली समिंदर,दिशा समिंदर,खुशी गवळी आदी उपस्थित होते.पहाटे फटाक्यांची आतषबाजी करून उपस्थितांना पेढे वाटण्यात आले.
या वेळी साहित्यिक तु.दा.गंगावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय लोकशाहीतील अमूल्य योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनकार्याचा व हिंदू कोड बिलाचा सखोल आढावा मांडला.तर जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांनी सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. संविधान नाकारणाऱ्या प्रवृत्ती बळावत असून लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करत,“डॉ.आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढली आहे.आपण प्रत्येक कृतीत कायद्याचे पालन करून संविधानाच्या मार्गावर चालले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात पंचशील व त्रिशरण वंदना सादर करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.
तसेच सकाळी ११ वाजता मा.आमदार सुजीतसिंह ठाकूर,शिवसेना (उबाठा) युवा नेते विश्वजित पाटील,नपा गटनेते अनिल शिंदे,जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत,मुकुल देशमुख,हनुमंत पाटील,उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर,नगरसेवक इस्माईल कुरेशी,रमेश परदेशी,मजहर दहलुज,मदनसिंह सदिवाल,डॉ.अब्बास मुजावर,माजी नगरसेवक मकरंद जोशी,ॲड.जाहिर चौधरी,उमाकांत गोरे,प्रा.विलास गायकवाड,दिपक गायकवाड, पांडुरंग मुसळे,ॲड.वाघमारे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.