धाराशिवमध्ये दिव्यांग शेतकऱ्याची न्यायासाठी भटकंतीत; कारवाई कुठे? निराशेतून आत्मदहनाचा इशारा..

धाराशिव,दि १५(माझं गांव माझं शहर) : दिव्यांग शेतकरी विठ्ठल गायकवाड यांचे स्वतःचे मौजे बामणी ता जि धाराशिव येथे गट नं ०२ मध्ये ३१ आर क्षेत्र आहे यांना गेल्या तीन वर्षांपासून स्वतःच्या शेतात वहिवाट करण्यास अडथळे निर्माण होत असून, यामुळे त्यांची शेती पडीक राहिली आहे. पोटापाण्याचा मुख्य आधार असलेली शेती बंद पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
या संदर्भात त्यांनी विश्वनाथ वामन गायकवाड गंगाबाई वामन गायकवाड नवनाथ वामन गायकवाड यांच्या विरुद्ध तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय धाराशिव तसेच बेंबळी पोलीस स्टेशन येथे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ते निराश झाले आहेत.
दिव्यांग असल्यामुळे त्यांना शेती करण्यासाठी अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन शेतात वहिवाट सुरळीत करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा निराशेतून दि १६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन दिव्यांग शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा करून माझ्या बरेवाईटास शासनच जबाबदार राहील असे दिव्यांग विठठल गायकवाड यांनी पत्रकात म्हटले आहे .या घटनेवर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!