भाजपाचे युवा नेते श्री. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट!

परंडा(प्रतिनिधी) भाजपाचे युवा नेते श्री. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते, धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार केला. तर याप्रसंगी त्यांचाही सत्कार करून स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ॲड. श्री. संतोष सूर्यवंशी, भाजपा नेते श्री. सुखदेव टोंपे, डोमगावचे माजी सरपंच श्री. मनोहर मिस्कीन, भाजपा युवा मोर्चा परंडा शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. अविनाश विधाते, नगरसेवक श्री. समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक श्री. अकिब पठाण, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. मल्हार पाटील यांनी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक आणि विविध विकास कामाबद्दल चर्चा केली.

error: Content is protected !!