परंडा : परंडा ते सोनारी मार्गावरील सोनारी गावाजवळ शहीद मेजर सागर तोडकरी यांच्या स्मारकासमोरील रोड उखडून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच हा रस्ता चढाचा असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना तर येथून वाहन नेणे म्हणजे मोठे कठीण ठरत आहे. तसेच डोंजा येथील पारेवाडी चढावर रस्ता खराब झाला आहे तसेच देऊळगाव येथे तर सहा महिन्यांपासून दैनिय अवस्था झाली आहे . या रस्त्याची टीव्ही चॅनल वर्तमानपत्र यामध्ये अनेक वेळा बातमी प्रसिद्ध झाली परंतु झोपलेले बांधकाम विभाग यांना जाग येत नाही. या मार्गावर मोटार सायकलचे अपघात घडत असून हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर अपघातांच्या घटनात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू, याबाबत माहिती देऊनही लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. असे काँग्रेसचे तालुका सचिव नितिन गाढवे यांनी सांगितले आहे.