परंडा (माझं गांव माझं शहर) आभाळ फाटल्यागत कोसळणारा मुसळधार पाऊस, संकटात भर म्हणून निसर्गाच्या कोपामुळे कितेक वर्ष हजारो लोकांची , मुक्या जनावरांची व बळीराजाच्या मदतीला खंबीरपणे निसर्गाच्या सान्निध्यात तग धरून असणारा मोहरी तलावांने अक्षरशा लोटांगण घातलं.तलावतील पाणी व कोसळणा-या पाऊसाच्या पाण्यांनी जनू काही अस्मानी युती केली अणि खैरी,नळी नदीच्या काठावरील शेतकरी, शेतकऱ्यांचे पशुधन, शैक्षणिक संकुल यांचे जनू काही अस्तित्वातच संपवून टाकल्या सारखं झालं. माणिकबाबा विद्यालय शेळगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगाव, देऊळगाव, वागेगव्हाण, आवार पिंपरी देवगाव खुर्द ,या शैक्षणिक संकुलाचे होत्याचे नव्हते झाले.खुप कष्टानं मेहनतीनं व शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळीच ठसा असणा-या या शाळांना खैरी नदीच्या महापूरात संपूर्ण गिळंकृत केले होते.
यामध्ये कधीच भरून निघणार नाही असे नुकसान या सर्व शाळेंचे झाले आहे. संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची लई पुण्यवान माती याच मातीची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वजण फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहू.फक्त आम्हाला आत्ता विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीचा हात हवा आहे.नक्कीच आपले हजारो हात मदतीला पुढे येतील आणि यातूनच आम्ही एकदा जोमाने उभारणी घेऊन शाळा हेच मंदिर व विद्यार्थी हेच आमचे दैवत समजून पडलेल्या शाळांना व महापूरची भीती मनात निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना खंबीरपणे उभा करण्यासाठी आपल्या सहकार्याने जोमात कामाला लागलो आहे.
📍अनिल गिरी(मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा गोसावीवाडी(डोंजा)