माणकेश्वर व देवगाव येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची प्रवीण रणबागुल यांच्याकडून मदत

भुम / परंडा-दि,२५( प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आभाळ फाटल त्यांच सगळच हिरांवल हा जलप्रलयाचा भूकंप आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा पुर आहे, पिकांच अतोनात नुकसान झाले असुन स्वप्नांचा चिखल हे वास्तव त्यांच्या जीवनात आहे.अतिवृष्टीमुळे हाजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.शेतकरी शेतमजुरांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.जगावं की मरावं हे त्यांना कळायला मार्ग नाही सर्वच पिके पालेभाज्या पाण्याखाली आल्यामुळे पिके खाक झाली बागायत पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.राज्य सरकार उध्वस्त झालेल्या बळीराजाची कधी दखल घेणार भुम/परंडा तालुक्यातील माणकेश्वर व देवगाव येथील संकटात असलेल्या बांधवांना ‘मदत नव्हे तर आपले सामाजिक कर्तव्य’ या भावनेतून संपूर्ण किराणा किट,जीवनावश्यक गोष्टी व ब्लैंकेट चे वाटप वंचित बहुजन आघाडी चे नेते मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या वतीने तात्काळ देण्यात आले
या संकटात शेतकऱ्यांवर आभाळही कोसळलं आणि पायाखालची शेतजमीनही वाहून गेली.जनावरे दगावली आहेत,अशा परिस्थितीमध्ये या संकटात जनतेचे अश्रू पुसण्यासाठी कृतिशील होत माणकेश्वर येथील जांब बाग वस्ती झोपडपट्टी वर तर परंडा तालुक्यातील देवगाव येथील साठे नगर मधील मातंग समाजातील १२ कुटुंबांना व २५ ते ३० लोकांना जेवण पाणी सुद्धा प्रशासनाकडून उपलब्ध झालं नाही १२ कुटुंबातील घर आणि संसार उपयोगी वस्तू पुरात वाहून गेल्याने जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला शासनाने दुर्लक्ष केले सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्याकडून आत्तापर्यंत कसलीच मदत केली नाही यावेळी विशाल गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्याशी फोनवरून दुखः वेदना व्यक्त केल्यानंतर त्यांनी तात्काळ देवगाव येथील साठे नगर मध्ये भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे किट पूरग्रस्त बांधवांना देण्यात आली आपल्या भागात उद्धभवलेल्या या परिस्थितीत गांभीर्याने वागून जनतेला धीर देत जनतेच्या सर्वोतपरी मदतीसाठी उभे राहात सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी दिला.

error: Content is protected !!