शेळगाव- माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विदारक मन हेलावून टाकनारं हे चित्र !

शेळगाव(प्रतिनिधी) अतिवृष्टीची वक्रदृष्टी हे विदारक मन हेलावून टाकनारं हे चित्र आहे परंडा तालुक्यातील सर्वाधिक पाण्याने वेढा दिलेले गाव म्हणजे शेळगाव याच गावातील माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे या विद्या मंदिरात हजारो विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे गिरवून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल केली.

शाळेची आज दुरावस्था केली ती प्रचंड बरसलेल्या मेघराजाने नदीकाठावर असलेली माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची ही पूर्वीची सुंदर इमारत आणि याच सुंदर इमारतीमध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा संगणक कक्ष विविध शैक्षणिक विध्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर घालणार शैक्षणिक साहित्य या साहित्याचा चक्काचूर म्हणजेच मेघराजाने दाखवलेली वक्रदृष्टी आणि याच वक्रदृष्टीमुळे आज या ज्ञानमंदिरामध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना खीळ घातली आहे.

परंडा तालुक्यामधील खाजगी शाळांच्या विचार केला तर नदीच्या काठावर सुंदर आणि देखणी इमारत या सुंदर आणि देखण्या इमारतीमध्ये हजारो शेकडो विद्यार्थी घडवणारे अत्यंत प्रामाणिक काम करणारे शिक्षक बांधव या सर्वांच्या सहकार्याने ही शाळा मुख्यमंत्री सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम आली तितकेच विद्यार्थी गुणी ज्ञानी आणि त्यांना ज्ञान अर्जंन करणारा शिक्षण तितकाच प्रामाणिक होता परंतु मागील चार दिवसापूर्वी काळ रात्र ठरलेल्या मेघराजाने वक्रदृष्टी फिरवली आणि होत्याचे नव्हते झाले नदीच्या काठावर असणाऱ्या सुंदर इमारतीमध्ये प्रचंड महापूरचे पाणी शाळेमध्ये घुसले आणि याच महापुरामध्ये या शाळेचे रात्रीत होत्याचे नव्हते झाले

आजही ही शाळा विद्यार्थ्यांना बसणे योग्य नसून त्या ठिकाणी मोठी पडझड झालेली आहे शैक्षणिक साहित्याचे मोठे प्रचंड नुकसान झालेले आहे शाळेच्या विद्यार्थ्यांची रेकॉर्ड या महापुराने स्वतःच्या कवेत घेऊन पुढे मार्गस्थ झाले आहे परंतु आज ही या शाळेला गरज आहे तुमच्या आमच्या मदतीची आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आपण अशी अपेक्षा करूया पुन्हा आपल्या सर्वांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने ही सुंदर शाळा नव्याने उभा करूया आणि याच शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांची स्वप्नाला पुन्हा उभारी घेण्यासाठी आपण सर्वांनी एक हात मदतीचा देऊ मात्र नक्की शाळेची प्रचंड झालेली दुरावस्था पाहून प्रत्येकाचं मनाला वेदनांचा पाझर फुटल्याशिवाय राहत नाही.

error: Content is protected !!