केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या भूम शहरात

भूम(माझं गांव माझं शहर) :-केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे शुक्रवार दि.२२ ऑगस्ट रोजी भूम शहरात आगमन होणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे दि.२१ ऑगस्ट रोजी रात्री मुंबई येथून लातूर एक्सप्रेस ने धाराशिव येथे दि.२२ ऑगस्ट रोजी पहाटे ४.४५ वाजता धाराशिव रेल्वे स्थानक येथे आगमन व शिंगोली सर्किट हाऊस येथे विश्राम करतील. तर सकाळी आठ वाजता भूमकडे प्रयाण करतील. सकाळी ९ वाजता भूम शहरातील कसबा येथील आरपीआयचे मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्या घरी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट देणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!