परंडा तहसील कार्यालयामध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधाकडे ; तहसीदारांचे दुर्लक्ष..!

परंडा (प्रतिनिधी) परंडा येथील शासकीय ऑफिस महत्त्वाचा कणा समजला जाणारे तहसील कार्यालय परंडा हे होय. या ठिकाणी दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. विविध शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिक दिवसभर तहसील कार्यालयामध्ये ताटकळत बसलेले असतात. परंतु या तहसील कार्यालयात मध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तो सध्या बंद अवस्थेत आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही अवस्था आहे…

अधिक बातमी वाचा...

बाळू मच्छिंद्र कांबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार.

परंडा,ता.१९ (प्रतिनिधी) तालुक्यातील डोणजे विद्यालय डोणजे येथे कार्यरत शिक्षक बाळू मच्छिंद्र कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे कडून सन २०२५ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे जागतिक शिक्षक दिनाच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात कांबळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात…

अधिक बातमी वाचा...

परंडा सरकारी दवाखाना सुविधा अभावी सलाईनवर ; वरिष्ठांचे दुर्लक्ष..!

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्याचा आरोग्य कणा समजला जाणाऱ्या परंडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नागरिकांना वेळेत सेवा सुविधा मिळत नाहीत.परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये गोळ्यांचा ,औषधांचा तुटवडा नेहमीच भासत आलेला आहे. परंडा येथे येणाऱ्या ग्रामीण शहरी भागातील रुग्णांना उपचार न करता नेहमीच रेफर केले जाते. या ठिकाणी वैद्यकीय वरिष्ठ अधिकारी बदली झाल्यापासून अद्यापही नेमणूक झालेली नाही. अनेक…

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ साखर कारखान्याकडून २०० रुपयांचा हप्ता खात्यावर जमा-चेअरमन अनिल सावंत

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम २०२४-२५ मधील दुसरा हप्ता प्रति मे. टन २०० रूपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे, अशी माहिती भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आहे. परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम २०२४- २५ मध्ये १ लाख ३९ हजार ६२१…

अधिक बातमी वाचा...

गोसावीवाडी(डोंजा) शाळेत केक कापून बालदिन साजरा

डोंजा: (प्रतिनिधी) जि.प.प्रा.शाळा गोसावीवाडी(डोंजा) येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थींचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.त्यानंतर केक कापण्यात आला.यावेळी गावातील भालचंद्र सूरवसे, मधूकर इटुकडे,पप्पू जाधव, मनोहर इटुकडे, महादेव इटुकडे,अमर खाडे, रोहिदास सूरवसे, आण्णा कौले, सीताबाई काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित व माहिती…

अधिक बातमी वाचा...

उद्योजक रामभाऊ पवार यांची महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड.

परंडा(तानाजी घोडके) उद्योगक्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे परंडा तालुक्याचे नाव यशाच्या शिखरावर पोहोचविणारे उद्योजक रामचंद्र पवार तसेच आपल्या लेखणीद्वारे साहित्य क्षेत्राला प्रभावित करणारे साहित्यिक तुकाराम गंगावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. परंडा तालुक्यातील या दोन्ही भूमिपुत्रांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. उद्योजक परंडा तालुक्यातील भुमिपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे…

अधिक बातमी वाचा...

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि.१३: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय…

अधिक बातमी वाचा...

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; बावची रोडवर धुळीचे साम्राज्य!

परंडा(प्रतिनिधी) परंडा शहरात अनेक महिन्यापासून दळणवळणाचे रस्ते खोदून ठेवले आहेत त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे. खडी टाकून अनेक दिवस झाले ना सिमेंट ना पाणी यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धूळ उडून दुकानदार व्यवसायिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या थंडीचे दिवस, कारखाने चालू असल्यामुळे शाळा महाविद्यालय चालू असल्याने मोठ्या प्रमाणात बावची चौक या…

अधिक बातमी वाचा...

उमेश कदम याचे विभागीय स्पर्धेत यश..

परंडा(माझं गांव माझं शहर ) लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, डोमगाव ता. परंडा येथील इयत्ता १० वी. च्या कु. उमेश नवनाथ कदम या विद्यार्थ्याने १७ वर्ष गोळा फेक स्पर्धेत विभागात दुसरा क्रमांक मिळवुन कु. उमेश कदम याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी विद्यार्थ्यांला प्रशिक्षक क्रीडाशिक्षक म्हणून श्री. राजाभाऊ शिंदे सर…

अधिक बातमी वाचा...

परंडा न.प. सीओ मनीषा वडेपल्ली यांची मुरूम येथे नियुक्ती.

परंडा (प्रतिनिधी) परंडा नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांची धाराशिव जिल्ह्यातीलच मुरुम येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत दि. `४ रोजी आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या नगर विकास विभागाने केल्या आहेत. मुख्याधिकारी वडेपल्ली यांची बदली करण्यात यावी…

अधिक बातमी वाचा...

जनसेवेचा आदर्श मा. मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकुर हे होय.

परंडा(माझं गांव माझं शहर ) राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर लोकांच्या समस्यांना समजून घेत त्यांच्या मदतीला अहोरात्र तत्पर राहण्याचा संकल्प आहे. याच संकल्पाचं मूर्तरूप म्हणजे राणाजगजितसिंह पाटील आणि सुजितसिंह ठाकुर या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.कोणत्याही संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला तत्परतेने धाव येणारे हे दोन्ही नेते खऱ्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथील तालीमीला निधी उपलब्ध करून दिला ; माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा सत्कार . 

परंडा (प्रतिनिधी) .कुऱ्हाड गल्ली परंडा येथील ओमराजे तालीम संघाला  बांधकाम करण्यासाठी परंडा नगरीचे माजी नगरअध्यक्ष . जाकीर सौदागर यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे नागरीकांच्या वतीने व तालीम संघाच्या वतीने आज दि.२ नोव्हेंबर रोजी सत्कार समारंभ करण्यात आला .        या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती जाकीर सौदागर , माजी उपनगराध्यक्ष .शाम मोरे . युवा नेते…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!