परंडा-ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे वीररत्न शिवा काशीद यांचा स्मृतीदिन ,बलिदान दिनानिमित्त अभिवादन…

परंडा - वीर शिवा काशीद अभिवादन

       परंडा ,ता.१३(प्रतिनिधी) स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपल्या बलिदानाची आहुती देणारे शिवाजी महाराजांचे विश्वासु मावळे वीर शिवा काशीद हे इतिहासात कायम अजरामर झाले.जन्माला शिवाजी काशीद म्हणुन जन्मले असले तरी शेवटच्या क्षणी शिवाजी महाराजांच्या नावाने वीरमरण पत्करले हे लाखमोलाचे आहे.असे मत ज्ञानेश्वरी शिक्षण  प्रसारक संस्था अध्यक्ष तानाजी घोडके यांनी व्यक्त केले.


        वीररत्न शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवार ता.१३ रोजी शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्हाईस ऑफ मीडिया जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद, ज्ञानेश्वरी शिक्षण  प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष तानाजी घोडके,सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा सचिव प्रमोद वेदपाठक यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. सिद्दी जौहारने शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळगडाला वेढा दिला होता.या कैदेतुन राजांची सुटका करण्यासाठी शिवाजी महाराजांचा हुबेहुब वेश परिधान करुन सिध्दी जोहारला भेटण्यासाठी गेलेल्या वीर शिवा काशीद यांना प्राणाचे बलिदान द्यावे लागल्याचा इतिहास आहे.यावेळी प्रकाश काशीद यांनी ऐतिहासीक दाखले देत वीर शिवा काशीद यांच्या जीवनकार्यासह,चित्तथरारक प्रसंगासह बलिदानदिनाची माहिती सांगितली.यावेळी व्यापारी संतोष भालेकर,विशाल काशीद,मेडिकल असोशियशनचे अतुल गोरे,दिपक तनपुरे, उमेश यादव, संतोष गोडगे, डॉ.नानासाहेब गरड विरेंद्रबाॕबी काशीद, मयुर डाके,करण काशीद, आदिसह नाभिक समाजातील बांधव,शिवप्रेमी नागरीकांची उपस्थिती होती.नुकतेच युनोस्कोच्या फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील ४७ व्या युनोस्कोच्या सुरु असलेल्या बैठकीत राज्यातील छञपती शिवाजी महारांजाच्या ११ गडकोट किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणुन मान्यता मिळाली आहे.त्यापैकीच एक “पन्हाळा” गड आहे.याच पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाची गाथा,बलिदान इतिहासात सर्वश्रुत आहे.

error: Content is protected !!