संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश : अक्षय सुरेश डोके यांना पीएच.डी. पदवी प्रदान

प्रतिनिधी,दि २(माझं गांव माझं शहर)संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कंडारी गावचे सुपुत्र अक्षय सुरेश डोके यांनीमिश्रित इलेक्ट्रोलाईट्ससह बोरोसिलीकेट ग्लास वर इलेक्ट्रो केमीकल डिस्चार्ज मशिनिंग (ECDM ) चे गणितीय मॉडेलिंग आणि प्रायोगिक तपासणी या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगास चालना मिळणार आहे . ही संशोधन पदवी त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे…

अधिक बातमी वाचा...

शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणी; शिवप्रेमींचा जल्लोष, प्रशासनाकडून परवानगीची सूचना.

परंडा, दि. १ : परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्याची घटना घडली. सकाळी नागरिकांना पुतळ्याचे दर्शन होताच शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, फटाके फोडून आणि जयघोष करत जल्लोष साजरा करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येत होती….

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी विशेष सभेची मागणी.

परंडा (माझं गांव माझं शहर): परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परंडा नगरपरिषदेमधील जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत नगरपरिषदेची तात्काळ विशेष सभा घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आज नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले….

अधिक बातमी वाचा...

जि.प. प्राथमिक शाळा बोडखा येथे गुढीपाडवा निमित्त शंभर टक्के प्रवेश

परंडा | माझं गाव माझं शहर :- परंडा तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा बोडखा येथे गुढीपाडवा निमित्त “प्रवेश वाढवा” अभियानांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये शंभर टक्के प्रवेश पूर्ण करण्यात आला. या उपक्रमामुळे गावात शैक्षणिक जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी विद्यार्थ्यांची आकर्षक प्रभात फेरी काढण्यात आली. फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे संदेश दिले, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण…

अधिक बातमी वाचा...

अमृत संस्थेमार्फत टंकलेखन व लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना;30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

माझं गांव माझं शहर दि. 23 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) आणि लघुलेखन परीक्षेचा निकाल 10 मार्च 2026 रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘अमृत’ संस्थेने परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू केली असून, पात्र विद्यार्थ्यांनी…

अधिक बातमी वाचा...

जिद्द आणि चिकाटीचा विजय: मोलमजुरी करून आईने मुलांना शिकवलं, मुलगा झाला पोलीस!

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कुभेफळ ता.परडा येथील निसार शेख झाला पोलिस “कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीपुढे आभाळही ठेंगणं असतं,” याचाच प्रत्यय कुभेफळ ता परंडा येथील एका माऊलीने आणून दिला आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, अत्यंत बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले आणि आज तिचा मुलगा पोलीस दलात भरती होऊन…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बक्षीस वितरण

, परंडा(MY VILLAGE MY CITY )बावची विद्यालय, परंडा . या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर विविध मॉडेल्स व प्रयोग सादर करून आपली वैज्ञानिक दृष्टीकोन व कल्पकता दाखवून दिली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे…

अधिक बातमी वाचा...

प्रा किरण देशमुख यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान

परंडा(माझं गावं माझं शहर) शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथील कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख यांना नुकतीच भारती विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी पदवी प्रदान केली आहे. दि. 4 मार्च 2026 रोजी त्यांचा भारती विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने तोंडी मुलाखत (परीक्षा) घेतली होती. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयात विज्ञानाचा उत्सव; गट विकास अधिकारी मा.श्री.विनोद जाधव यांनी विद्यार्थ्यांशी साधला सुसंवाद.

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बावची विद्यालय, परंडा येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ C. V. Raman यांनी लावलेल्या Raman Effect या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मा.श्री.विनोद जाधव साहेब गट विकास अधिकारी,पंचायत समिती परंडा…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील सोनारी येथील; ऋतुजा लोखंडेला बीडीएस पदवी प्रदान

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील सोनारी येथील ऋतुजा संतोष लोखंडे हिने बॅचलर  ऑफ डेंटल सर्जरीचा (बीडीएस) पदवी प्राप्त केली. अहिल्यानगर येथील स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेजमध्ये ऋतुजा ने पाच वर्षाचा बीडीएस अभ्यासक्रम पूर्ण केला.   दिनांक १ मार्च रोजी अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. सोनारी येथील फळ विक्री करणारे संतोष लोखंडे यांची डॉक्टर ऋतुजा…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, परंडा येथे ‘घर घर संविधान’ रथ यात्रेचे उत्साहात स्वागत

परंडा : दि.२३(प्रतिनिधी) रोजी बावची विद्यालय, परंडा येथे महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित ‘घर घर संविधान ’ रथ यात्रेचे प्रार्थनेच्या वेळी उत्साहात आगमन झाले. विद्यालयात रथ यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी रथासोबत आलेल्या कलाकारांनी प्रभावी व संदेशपूर्ण पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याविषयी माहिती…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री. प्रभाकर मिरगणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर यांच्यासह श्री. सचिन मोरे सर, श्री….

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!