शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापराबाबत आता असणार हे नियम….
मुंबई (माझं गांव माझं शहर)– राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा दि.२९ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन…