विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतप्त ग्रामस्थांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी.

परंडा (तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील देऊळगाव खैरी नदीवर असलेला कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील पूल सध्या जीवघेणा ठरत असून, या मार्गावरील रहदारीमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः या पुलावरून शाळा असल्यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. देऊळगाव – डोंजा या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या पुलावरील संरक्षित लोखंडी कठाडे ( रेलिंग) पूर्णपणे वाहून गेले…

अधिक बातमी वाचा...

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये २५ वर्षानंतर रंगला ६०जणांचा स्नेह मेळावा.

रामेश्वर(प्रतिनिधी)सन 1999-2000 सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज २५ वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते. धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात…

अधिक बातमी वाचा...

आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

परंडा (प्रतिनिधी) आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने शेतीसह सर्वच उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पाषाण पुणे यांच्या सहकार्याने परंडा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आधार सामाजिक संस्थेच्या वतीने परंडा तालुक्यातील 600 पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.समाजातील…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र ग्रामिण बँक स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न .

अनाळा (माझं गांव माझं शहर) दि .१७ परंडा तालुक्यातील अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा शाखा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात दि . १६ रोजी संपन्न झाला . अनाळा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एकमेव शाखा आहे . ही शाखा गेल्या अनेक वर्षापासून अनाळा येथील ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या इमारतीमध्ये चालू होती . या इमारतीमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे…

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ शुगर सोनारी सात लाख मे. टन गाळप करणार

परंडा दि.१४(तानाजी घोडके) तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याने सात लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली. सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखण्याच्या सन २०२५-२६ च्या अठराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिपादन सोहळा मंगळवार दि. १४ रोजी मोठ्या उत्सहात…

अधिक बातमी वाचा...

आंबी पोलीस ठाणे हद्दीत खळबळः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी..

आंबी(माझं गांव माझं शहर) एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून, झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर पीडित मुलीने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली असून, गावातीलच एका तरुणावर लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि अँट्रॉसिटी कायद्याच्या गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पीडित…

अधिक बातमी वाचा...

लोकसेवा माझ्यासाठी राजकारणाचा मार्ग नाही, तर जीवनाचा श्वास आहे-दिनेश मांगले

परांडा (प्रतिनिधी) दि.१४ – तालुक्यातील शेळगाव सर्कलमध्ये काल राजकारणाच्या रंगमंचावर एक असा निर्णय घडला, की ज्याने प्रत्येक कार्यकर्त्याचे, मतदाराचे आणि सामान्य जनतेचे मन भारावून गेले. जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष घोषित झाल्यानंतर सर्वांचं लक्ष एकाच नावाकडे लागलं होतं – जनतेचा विश्वासू चेहरा दिनेश रोहिदास मांगले. परंतु सर्वांना धक्का देणारा आणि त्याचवेळी अंतःकरण पिळवटून…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा, शिपाईच निघाला मास्टरमाइंड

धाराशिव, १४ ऑक्टोबर २०२५: तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांच्याोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, याच शाखेत कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे हाच या चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला नागपूर येथून अटक केली असून,…

अधिक बातमी वाचा...

‘येसूबाई’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आई तुळजाभवानी चरणी शेतकऱ्यांसाठी घातले साकडे.

तुळजापूर (प्रतिनिधी) ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मराठी मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करत नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आईच्या चरणी कळकळीची प्रार्थना केली. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि जमिनीचे मोठे…

अधिक बातमी वाचा...

कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक किट वाटपाचा शुभारंभ

धाराशिव(माझं गांव माझं शहर) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांसाठी कोटक बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या किट असलेल्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून या मदतकार्याचा शुभारंभ करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे….

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील दिव्यांगांना अन्नधान्य किट वाटप

परंडा( प्रतिनिधी) तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे शेतीचे घराचे नुकसान झाले, संसार उघड्यावर पडला घरात पाणी शिरले शेतीचे नुकसान झाले अशा दिव्यांग बांधवांना दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यानुसार एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत दिलीपराव वळसे पाटील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्यातील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.यावेळी…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

धाराशिव(माझं गांव माझं शहर)धाराशिव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदाच्या सन २०२५-२०३० या कालावधीसाठीचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया १३ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. ही घोषणा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, डॉ. मृणाल जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या सूचनेनुसार, सदस्य पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने (ड्रॉ लॉट्स) काढण्यात येणार आहे. हा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!