परंडा सरकारी दवाखाना सुविधा अभावी सलाईनवर ; वरिष्ठांचे दुर्लक्ष..!

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्याचा आरोग्य कणा समजला जाणाऱ्या परंडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नागरिकांना वेळेत सेवा सुविधा मिळत नाहीत.परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये गोळ्यांचा ,औषधांचा तुटवडा नेहमीच भासत आलेला आहे. परंडा येथे येणाऱ्या ग्रामीण शहरी भागातील रुग्णांना उपचार न करता नेहमीच रेफर केले जाते. या ठिकाणी वैद्यकीय वरिष्ठ अधिकारी बदली झाल्यापासून अद्यापही नेमणूक झालेली नाही. अनेक…

अधिक बातमी वाचा...

सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे – डॉ शहाजी चंदनशिवे

परंडा(प्रतिनिधी) सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे एक एक मत महत्त्वाचे आहे एका मताने सरकार बनते व एका मताने सरकार पडते म्हणून प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्रनिर्मिती साठी सहभाग निश्चित केला पाहिजे. देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे. असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्रा डॉ शहाजी…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून जाकिर भाई सौदागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

परंडा : नगर परिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी, शिवसेनेच्या वतीने जाकिर भाई सौदागर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी…

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ साखर कारखान्याकडून २०० रुपयांचा हप्ता खात्यावर जमा-चेअरमन अनिल सावंत

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम २०२४-२५ मधील दुसरा हप्ता प्रति मे. टन २०० रूपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे, अशी माहिती भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आहे. परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम २०२४- २५ मध्ये १ लाख ३९ हजार ६२१…

अधिक बातमी वाचा...

गोसावीवाडी(डोंजा) शाळेत केक कापून बालदिन साजरा

डोंजा: (प्रतिनिधी) जि.प.प्रा.शाळा गोसावीवाडी(डोंजा) येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थींचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.त्यानंतर केक कापण्यात आला.यावेळी गावातील भालचंद्र सूरवसे, मधूकर इटुकडे,पप्पू जाधव, मनोहर इटुकडे, महादेव इटुकडे,अमर खाडे, रोहिदास सूरवसे, आण्णा कौले, सीताबाई काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित व माहिती…

अधिक बातमी वाचा...

उद्योजक रामभाऊ पवार यांची महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड.

परंडा(तानाजी घोडके) उद्योगक्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे परंडा तालुक्याचे नाव यशाच्या शिखरावर पोहोचविणारे उद्योजक रामचंद्र पवार तसेच आपल्या लेखणीद्वारे साहित्य क्षेत्राला प्रभावित करणारे साहित्यिक तुकाराम गंगावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. परंडा तालुक्यातील या दोन्ही भूमिपुत्रांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. उद्योजक परंडा तालुक्यातील भुमिपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे…

अधिक बातमी वाचा...

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; बावची रोडवर धुळीचे साम्राज्य!

परंडा(प्रतिनिधी) परंडा शहरात अनेक महिन्यापासून दळणवळणाचे रस्ते खोदून ठेवले आहेत त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे. खडी टाकून अनेक दिवस झाले ना सिमेंट ना पाणी यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धूळ उडून दुकानदार व्यवसायिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या थंडीचे दिवस, कारखाने चालू असल्यामुळे शाळा महाविद्यालय चालू असल्याने मोठ्या प्रमाणात बावची चौक या…

अधिक बातमी वाचा...

अवैध बिल आकारणे व धर्मादाय नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण; धर्मदाय आयुक्तांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

बार्शी (प्रतिनिधी)शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटलने अधिक आणि अवैध बिल आकारल्याबाबत एका रुग्णाने गंभीर तक्रार नोंदवली असून, या प्रकरणात शासन निर्देश आणि धर्मादाय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराने पुणे विभागातील धर्मादाय आयुक्त आणि सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे ही तक्रार नोंदवली असून, बार्शी ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत सदर तक्रार पाठवली आहे. जगदाळे मामा हॉस्पिटल हे…

अधिक बातमी वाचा...

 दिल्ली हादरली ! लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू

दिल्ली(प्रतिनिधी) राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे.राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.नवी दिल्लीत सोमवारी (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात…

अधिक बातमी वाचा...

बार्शी हादरली ! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं.

बार्शी(प्रतिनिधी) बार्शी तालुक्यात एका आईने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे असे आहे. अंकिता ही विवाहित असून तिला 14 महिन्यांचा मुलगा होता. अंकिताने आपल्या चिमुरड्याला विष (Poision) पाजून त्यानंतर साडीने गळफास लावून आत्महत्या (Suicide News) केल्याचा प्रकार शुक्रवारी…

अधिक बातमी वाचा...

शेतकरी कन्यां कु.माधुरी जगदाळे हिचा माजलगाव येथील मेडिकल कॉलेजला बीएएमएस मेडिकला प्रवेश

परंडा (दि ९नोव्हेंबर)परंडा तालुक्यातील टाकळी येथील सर्व सामान्य शेतकरी कुटूंबातील कु.माधुरी ईश्वर जगदाळे हिला माजलगाव येथील मेडिकल कॉलेजला (बीएएमएस)मडिकला प्रवेश मिळाला आहे.माधुरी जगदाळे ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी व श्री.संत ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय,टाकळी ची माजी विद्यार्थ्यांनी आहे.कु.माधुरी जगदाळे लाहाण आसतानाच तीच्या वडीलाचे अकस्मीत निधन झाले.तीच्या शिक्षणाची व कुठूंबाची पूर्ण जबबदारी आई,आजोबा, आज्जी,चुलते,चुलती यांच्यावर…

अधिक बातमी वाचा...

बालाजी भांडवलकर व निशा लांडघुले यांचा मा.आ.ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

परंडा(माझं गांव माझं शहर)लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत जय हनुमान माध्यमिक विद्यालय, वाटेफळ, ता. परंडा येथील कुमारी निशा संतोष लांडघुले हिने १९ वर्ष १०० मीटर रनिंग स्पर्धेत विभागात दुसरा क्रमांक तर जिल्ह्यात पहिली आली तसेच हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या किक बॉक्सींग स्पर्धेत ७५ वजन गटात वाटेफळ, ता. परंडा येथे कु. बालाजी आप्पासाहेब भांडवलकर…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!