शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील प्रवेशासाठी अर्ज करा – प्राचार्य केशव पवार

परंडा – परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मे पासून सुरू झाली असून, पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया ०१ जूनला उपलब्ध करून दिली जाणार आहे. कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण ०३व्यवसायासाठी ६०जागा उपलब्ध आहेत. यामध्ये अभियांत्रिकी गटात इलेक्ट्रिशिअन, वेल्डर तर बिगरअभियांत्रिकी गटात ड्रेसमेकिंग, हे व्यवसाय उपलब्ध आहेत.
कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी २१ मे पासून निःशुल्क मार्गदर्शन संस्थेत आयोजित करण्यात आले आहे.


प्रवेश प्रक्रियेचा तपशील : कालावधी

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : २१ मेपासून
  • प्रवेश अर्ज निश्चित करणे, अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अज निश्चित करणे : २१ मे पासून
  • पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्य सादर करणे : १ जूनपासून
    कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा मधील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी ‘https://admission.dvet.gov.in’ या संकेतस्थळांवर उपलब्ध असून, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावर जाऊन प्रवेश नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांनी केले आहे.
error: Content is protected !!