माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील रिटेवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. केशराबाई बापू रिटे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकसेवेच्या उद्देशाने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी करमाळा तालुक्याचे युवा नेतृत्व, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक मा. श्री. शंभूराजे जगताप यांनी सौ. रिटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मा. शंभूराजे जगताप यांनी, “नेतृत्व हे लोकाभिमुख असावे आणि विकास तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे, हाच आमचा ध्यास आहे,” असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच सौ. केशराबाई बापू रिटे यांच्या नेतृत्वाखाली रिटेवाडी गाव विकासाची नवी उंची गाठेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
