परंडा (प्रतिनिधी): परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली परंडा तालुक्यातील अतिक्रमित झोपडपट्टी धारकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
नवीन नियमानुसार सर्वेक्षण सुरूशासनाच्या नवीन नियमावलीनुसार सध्या परंडा तालुका व परिसरातील विविध भागांमध्ये झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. या मोहिमेत पात्र ठरणाऱ्या झोपडपट्टी धारकांची माहिती संकलित केली जात असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
प्रमुख मागण्या आणि संघटनेची भूमिका
कायमस्वरूपी मालकी हक्क: अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जागेचा कायदेशीर मालकी हक्क मिळावा.सातबारा नोंद पात्र झोपडपट्टी धारकांच्या नावावर जमिनीची सातबारा नोंद करण्यात यावी.योग्य पुनर्वसन: प्रशासनाने कोणत्याही गरिबावर अन्याय न करता त्यांचे हक्काचे पुनर्वसन करावे.
शासकीय योजनांचा लाभ: सर्व पात्र कुटुंबांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून द्यावा.प्रशासनाकडून सकारात्मक भूमिकेची अपेक्षागोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. या संवेदनशील विषयावर स्थानिक प्रशासनानेही सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.या पत्रकार परिषदेला राजाभाऊ शिंदे, सोनवणे, गोवर्धन शिंदे .दयानंद बनसोडे . यांच्यासह तालुक्यातील अनेक नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
