परंडा (माझं गांव माझं शहर, दि.१४) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डी.बी.ए. समूहाच्या वतीने परंडा येथील आठवडा बाजार चौकात उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रतिमेचे पूजन मा. नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, माजी उपनगराध्यक्ष मतीन जिनेरी, खय्युम तुटके, दीपक गायकवाड, महेश कसबे, नासिर सय्यद, महेश थोरबोले, अभिमान सुतार, डॉ. नागेश डाके, धर्मराज नरोटे, दशरथ मारकड, प्रीतम ओव्हाळ, आनंद बनसोडे तसेच डी.बी.ए. समूहाचे संस्थापक/अध्यक्ष मा. दयानंद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली असून, उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात आले. गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, गणवेश, वह्या व पुस्तके वाटप करण्यात आले. तसेच निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी भाषणांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले. याशिवाय इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने गृहउपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले.
कार्यक्रमास जयंती समिती अध्यक्ष दयानंद धेडे, उपाध्यक्ष महावीर बनसोडे, बाळू बनसोडे, अल्लाउद्दीन शेख, कानिफनाथ सरपणे, सम्यक धेंडे, दत्तात्रय पाटील, पत्रकार बंधू तसेच महिला वर्गामध्ये आरती बनसोडे, कल्पना बनसोडे, सुषमा बनसोडे, संगीता बनसोडे, लक्ष्मी जाधव, सुशीला चौधरी, सोनवणे मॅडम, गणिता गव्हाळे, रुक्मिणी चौधरी, राजश्री, उषा सुतार, शिल्पा चौधरी, प्राची बनसोडे आदींसह बहुसंख्य नागरिक, भीमसैनिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी डी.बी.ए. समूहाचे संस्थापक दयानंद बनसोडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.