अधिकारी,कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या महिला ग्रामपंचायत अधिकारी यांची चौकशी करून प्रशासकीय करवाई करा.

परंडा दि.१३ (माझं गांव माझं शहर) :परंडा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात गैरवर्तन व अनियमित कारभाराच्या तक्रारी समोर आल्याने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी संघटना डी एनई१३६ शाखा परंडा यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आसुन सदर निवेदनात म्हटले आहे की संबंधित महिला अधिकारी या कार्यालयीन कामकाजादरम्यान विविध विकासकामांमध्ये अनियमितता करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच,त्यांच्या वर्तणुकीमुळे कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास होत असून,चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांकडून धमकी दिली जात असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय,संबंधित अधिकाऱ्यांकडून सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी, विशेषतःमहिलांशी,अयोग्य वक्तव्ये केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.त्यामुळे कार्यालयीन वातावरण बिघडत असून प्रशासनाच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी,अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

या निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष गरड डी.आर.,हरिचंद्र चौधरी,मदने व्ही व्ही,जिल्हा अध्यक्ष भोसले वाय बी,कावळे सु एस,यादव के के,राठोड एस एस,शहापुरे एस एन,भांडवलकर व्ही एम, नंदनवार एन बी,शिंदे ए एन,शिंदे एस बी, कांबळे बी एम,माने के व्ही,गरड पी व्ही, गिरी एस बी,बेद्रे एस बी,सातपुते आर एन, जाधव व्ही पी,वेदपाठक डी एस,घुबे जी व्ही,माडजे बी आर,परखंडे आर एम यांच्या सह संघटनेच्या पदाधिकारी,सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या प्रकरणाची चौकशी करून चौकशी अंती गटविकास अधिकारी सदर ग्राम पंचायत अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करतात याकडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!