परंडा शहरातील रस्त्यासह ग्रामीण भागातील पालखी मार्ग; रस्त्यांची दुरावस्था प्रशासनाचे दुर्लक्ष !

प्रतिनिधी( माझं गांव माझं शहर) परंडा शहरात मूख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दैननीय झालेली असताना सध्या उन्हाळ्याचे दिवस येत असल्याने सध्या एक गाडी रस्त्यावरुन गेली धुळीचे मोठ मोठे धुळीचे लोट सर्वत्र पसरत आहेत.

   त्यामुळे शहरवासीयांना श्र्वासोश्र्वासनाचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरातील एसटी बस स्थानकापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत चा हा शहरातील मुख्य रस्ता असुन या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. याकडे नगर पालिकेच्या प्रशासनाने यांनी त्वरित  लक्ष देवुन हा रस्ता दुरुस्ती करावी

  सध्या एक वाहन जरी गेले तरी धुळीचे लोट निर्माण होतात शिवाय पादचारी यांना सुध्दा चालताना त्रास होत आहे शहरातील व्यावसायिक या धुळीस वैतागून गेले आहेत सततच्या धुळीचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती परंडा शहराची झाली आहे तसेच हीच परिस्थिती तालुक्यातील विविध रस्त्याची अवस्था ही अशीच आहे या कडेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे

परंडा ते अरणगांव टाकळी तसेच परंडा ते अनाळा व अनाळा ते तांदुळवाडी डोंजा- देऊळगाव  या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी या कडे लक्ष देवुन खराब झालेली रस्ते नव्याने त्वरित दुरूस्ती करून द्यायला पाहिजेत अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे

परंडा ते वारदवाडी या रस्त्यावर परंडा वारदवाडी हा ११ कि मी चे अंतर पास करण्यासाठी जवळपास पासुन अर्धा तास लागतो या रस्त्याचे काम सध्या संथ गतीने चालू आहे संबंधित ठेकेदार यांनी ठिक ठिकाणी एक बाजुचा रस्ता खोदून ठेवत असलेल्या मुळे वाहतूकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे शिवाय छोटे मोठे अपघात झाले आहेत या झालेल्या अपघातात काही जणांनी आपला जीव देखील गमावला आहे

  परंडा शहरातुन श्री संत एकनाथ महाराज पैठण याचा पालखी मार्ग परंडा तालुक्यातुन जातो पण मार्गाचे काम देखील संथ गतीने चालू आहे यामुळे परिवहन महामंडळाच्या वतीने जेकटेवाडी देवगांव बु या मार्गावरील काही बससेवा बंद केल्या आहेत याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे
जिल्हा सरहद्दीवर पालखी मार्गाचे पुढील काम सोलापूर बांधकाम विभागाने गेले एक वर्ष पुर्वी केले आहे पण परंडा तालुक्याच्या हद्दीतील काम पूर्ण केले नाही येत्या चार महिन्यात संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा याच रस्त्याने जाणार आहे
तो पर्यंत तरी या रस्त्याचे काम बांधकाम विभागाने पुर्ण करावे अशी मागणी भाविक भक्तांची आहे
या खराब रस्त्यामुळे वाहन चालकाना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते परंडा तालुक्याच्या हद्दीच्या पुढे करमाळा व बार्शी येथील बांधकाम विभागाने आप आपल्या हद्दीतील कामे पुर्ण केली आहेत पण परंडा तालुक्यातील रस्त्याची होत नसल्याने नागरिकांतुन नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आपण जर पाहिलं तर आपला  परंडा तालुक्याला मागसलेला म्हणून राज्यात परिचित आहे त्यात आणखी खराब रस्त्याची भर पडत आहे तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित लक्ष देवुन रस्त्ता दुरुस्ती ची कामे सुरू करावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतुन होत आहे

error: Content is protected !!