परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा येथील जिजाऊ ब्रिगेडच्या मराठवाडा उपाध्यक्ष शिक्षण संस्थेच्या सचिव आशाताई गोरख मोरजकर यांनी मोठमोठ्या आजारांना झगडत महिला जागृती , छत्रपती शिवराय , छ . राजश्री शाहु महाराज ,महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले , फातीमा शेख , अहिल्यादेवी होळकर , त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे विचार घेऊन सर्व जातीधर्माचा सलोखा कायम राहण्यासाठी समाजात रात्रंदिवस काम करतात एक आदर्श समोर ठेवतात त्या थोर विचारांनी पेटलेल्या आशाताई मोरजकर यांना दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या परंडा शाखेले माता रमाई जयंतीचे औचित्य साधून मानाचा ‘समाजभूषण ‘ पुरस्कार देऊन सन्मानित केले .
या पुरस्काराची आयोजन महाराजिका बुद्ध महाविहाराचे सर्वासर्व राजेंद्र निकाळजे , ता . अध्यक्ष जयंत चौतमहाल , सोनाली दाभाडे , जयमाला ठोसर यांनी केले . या समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने आशाताई मोरजकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.