तालुक्यात आज १३० केंद्रावर मतदान सोमवारी मत मोजनी.

परंडा  दि. ६) परंडा तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांसाठी आज दि. ७ रोजी १३० मतदान होणार असून जि.प. व. पं.स. च्या एकून ७३ उमेदवारांचे भवितव्या मतपेटीत बंद होणार आहे.

        तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांसाठी आज होणाऱ्या १३० मतदान केंद्रावर निवडणूक होत असून, रिंगणात असलेल्या एकूण ७३ उमेदवारांचे भवितव्य आज एकून १ लाख ७ हजार ८५६ मतदारांच्या हाती असणार आहे. प्रशासनाने या प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, शुक्रवारी निवडणूक साहित्याचे वाटप करून कर्मचरी केंद्रांकडे रवाना झाली आहेत. ​या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी ३० उमेदवार, तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी ४३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रत्येक गटात आणि गणात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तालुक्यात एकूण १३० मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर ४ याप्रमाणे ५२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी १३० पोलीस कर्मचारी आणि १३० शिपाई तैनात असतील. तसेच १० झोनल अधिकारी, १० असिस्टंट झोनल अधिकारी आणि १३ मास्टर ट्रेनर या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. आज सकाळी ७ : ३० वा. ते सायंकाळी ५ : ३० वा. या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतदानानंतर सर्व यंत्रे सील करून स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवली जातील. या निवडणुकीचा निकाल सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

error: Content is protected !!