परंडा दि २२ ( प्रतिनिधी ) शेळगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून चिंचपूर येथील उद्योजक शरद पवार यांनी प्रस्थापितांसमोर कडवे आव्हन निर्माण केले आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणणाले आहेत. परंडा तालुक्यातील शेळगाव गटातून जनसामान्य माणसातील व्यक्तीला मिळताच उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गावच्या सर्कलच्या जाण्यासाठी मी निवडणूक हाती घेत आहे असे सांगत शेवटच्या दिवशी अर्ज सदर केला आहे.
पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आजपर्यंत या मतदारसंघातील प्रस्थापितांनी दुर्लक्ष केले त्यामुळे विकास झाला नाही असे सांगत अर्ज भरला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे युवा नेते संकेत ठाकुर, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश पावर पंचायत समिती माजी सदस्य सतीश देवकर युवा नेते अनिल पाटील, सरपंच महेश देवकर यांच्यासह शेळगाव गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा निर्णय घेतल्याने प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत असे सांगीतले .या गटातील ग्रामस्थांच्या अडचणीची विकास कामे स्वखर्चातून केल्याने या भागातील नागरिकांकडून उद्योजक शरद पवार यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे या भागातील विकास कामे यापुढे देखील सुरु राहातील असे उद्योजक पवार यांनी सांगितले. शेळगाव जिल्हा परिषद गटातून ग्रामस्थांच्या इच्छेनुसार निवडणूक लढवीत आहे बोलताना पवार यांनी सांगितले.