परंडा(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून श्री. नारायण खैरे सर, प्राचार्य,बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय,परंडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालक-विद्यार्थी यांचा समन्वय कसा आवश्यक आहे, अभ्यासातील सातत्य,शिस्त, मूल्यशिक्षण व पालकांची भूमिका यावर श्री.खैरे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास मान्यवर म्हणून श्री.धनंजय मोरे (माजी जि.प. सदस्य),श्री. रमेश जमादार,श्री. हरिश्चंद्र मिस्कीन (संचालक, मजूर फेडरेशन),तसेच श्रीम. शितल माने महिला पालक उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून पालक-शिक्षक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मेळाव्यास विद्यालयातील शिक्षकवृंद,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालय प्रशासन व शिक्षकांनी परिश्रम घेतले.